Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

Shruti Vilas Kadam

सर्वप्रथम पुरेसे पाणी प्या

डोकेदुखी सुरू झाल्यावर शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे त्रास जाणवताच पाणी पिण्याकडे लक्ष द्या.

drink water | pinterest

जेवणाच्या वेळा चुकवू नका

खूप वेळ उपाशी राहणे किंवा जेवणाच्या वेळा सतत चुकवणे यामुळे काही लोकांमध्ये डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर आणि संतुलित आहार घेण्याची सवय लावा.

Dinner | pinterest

पौष्टिक आहार घ्या

डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्यास लगेचच हलका आणि सकस आहार घेणे उपयोगी ठरू शकते. घरगुती, पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

HEALTHY FOOD | Google

दीर्घश्वसनाचा सराव करा

डोकेदुखीच्या वेळी काही मिनिटे खोल आणि संथ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. दीर्घश्वसनामुळे शरीर रिलॅक्स होण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

meditation | saam tv

तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा

मानसिक ताण, चिंता आणि सततचा विचार यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे ध्यान, विश्रांती किंवा शांत वातावरणात काही वेळ घालवणे फायदेशीर ठरू शकते.

stress | yandex

झोप पूर्ण घ्या

अपुरा किंवा अनियमित झोपेचा परिणाम डोकेदुखीवर होऊ शकतो. त्यामुळे दररोज पुरेशी आणि नियमित झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपेची वेळ निश्चित ठेवणेही महत्त्वाचे आहे.

sleep | pinterest

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका

डोकेदुखी किंवा मायग्रेन वारंवार होत असेल, वेदना तीव्र असतील किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची डोकेदुखी सुरू झाली असेल, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Severe headache | pinterest

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

Sarva Pitru Amavasya 2026 | Saam Tv
येथे क्लिक करा