Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

Shruti Vilas Kadam

लोखंडाच्या वस्तू

सर्वपितृ अमावस्येला लोखंड किंवा लोखंडापासून तयार केलेल्या वस्तू घरात आणणे टाळावे, अशी धार्मिक मान्यता आहे. लोखंडाच्या वस्तू खरेदी केल्यास धनहानी किंवा शनीशी संबंधित अडचणी येऊ शकतात, असे मानले जाते.

Iorn

मोहरीचे तेल

या दिवशी मोहरीचे तेल घरी आणणेही टाळावे, अशी मान्यता आहे. सर्वपितृ अमावस्येला मोहरीचे तेल खरेदी केल्यास अशुभ परिणाम होऊ शकतात, असे धार्मिक समजुतीत सांगितले जाते.

OIL

चाकू किंवा धारदार वस्तू

सुई, चाकू, कात्री, खिळे यांसारख्या धारदार वस्तू या दिवशी खरेदी करू नयेत, असे मानले जाते. अशा वस्तू घरात आणल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात, अशी धार्मिक धारणा आहे.

knife | GOOGLE

नवीन कपडे

पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मरणासाठी समर्पित काळ मानला जातो. त्यामुळे सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करणे टाळावे, अशी धार्मिक मान्यता आहे.

CLOTHES

नवीन बूट-चपला

नवीन कपड्यांप्रमाणेच सर्वपितृ अमावस्येला नवीन बूट किंवा चपला खरेदी करू नयेत, असेही मानले जाते. या दिवशी अशा वस्तूंची खरेदी केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी धारणा आहे.

Shoes | GOOGLE

भेटवस्तू

सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी भेटवस्तू घरात आणणे अशुभ मानले जाते. अशा वस्तू खरेदी केल्याने घरातील वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी धार्मिक समजूत आहे.

Gift | yandex

अनावश्यक खरेदी टाळा

सर्वपितृ अमावस्या हा पितरांचे स्मरण, श्राद्ध आणि तर्पणासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याऐवजी धार्मिक विधी आणि पूर्वजांच्या स्मरणाला महत्त्व द्यावे, अशी परंपरा आहे.

Shopping | yandex

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Alu Vadi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा