Manasvi Choudhary
सिताफळ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. सिताफळमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स ही पोषणतत्वे असतात.
सिताफळ खाल्ल्याने शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सिताफळामध्ये व्हिटॅमिन सी असते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
सिताफळ या फळामध्ये फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास कमी होतो.
सिताफळ वजन वाढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात नैसर्गिक शुगर आणि कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.
सिताफळ फळामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या पेशींचे रक्षण करते. नियमित सिताफळ खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांचे आजार दूर ठेवण्यास मदत होते.
सिताफळामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स असते, जे त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते. तसेच यातील पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत करतात.
सिताफळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि तांबे ही खनिजे असतात, जी हाडे आणि सांधे बळकट करण्यासाठी फायदेशीर असतात.
NEXT: Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट