Manasvi Choudhary
कपलसाठी लग्नाचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास आणि आनंदाचा क्षण असतो. लग्न पक्के झाल्यापासून ते प्रत्यक्ष लग्न लागेपर्यंतचा काळ प्रत्येक कपलसाठी अत्यंत रोमँटिक आणि उत्साहाचा असतो.
आजकाल लग्नाआधी 'प्री-वेडिंग शूट' करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. परफेक्ट पोझ आणि सुंदर बॅकड्रॉपसाठी अनेक कपल्स उत्तम ठिकाणांचा शोध घेतात.
परदेशातच नाही तर भारतामध्ये अशी अनेक अप्रतिम आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जिथे तुमचे प्री-वेडिंग शूट करू शकता. भारतामधील 5 सर्वोत्तम प्री-वेडिंग शूट डेस्टिनेशन्स कोणते ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जर तुम्हाला तुमच्या प्री-वेडिंग शूटमध्ये शाही आणि रोमँटिक फील हवा असेल, तर राजस्थानमधील 'उदयपूर' हे जगातील सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. येथील भव्य राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, सुंदर तलाव आणि बोटीची सफारी तुमच्या फोटोंना एक राजेशाही लूक देतात.
बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवीगार जंगले, खळाळत्या नद्या आणि सुंदर दऱ्यांच्या साक्षीने फोटोशूट करायचे असेल, तर मनाली हे अत्यंत रोमँटिक ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात काढलेले येथील फोटो नेहमीच खास ठरतात.
'पिंक सिटी' म्हणून ओळखले जाणारे जयपूर फोटोग्राफीसाठी बेस्ट आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, प्राचीन महाल, रंगीबेरंगी गल्लीबोळ आणि पारंपरिक राजस्थानी वास्तुकला प्री-वेडिंग शूटसाठी बेस्ट आहे.
जर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला निसर्गरम्य समुद्रकिनारे आवडत असतील, तर गोव्याला नक्की भेट द्या. खळाळणारे समुद्र, सोनेरी वाळू, नारळाची उंच झाडे आणि अथांग सागर आणि सनसेट यासाठी तुम्ही गोवा निवडू शकता.
डोंगर, शांत वाहणारी गंगा नदी आणि हिरवीगार पर्वतरांगांच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात ऋषिकेश हे ठिकाण बेस्ट आहे. येथील जुने पूल, घाट आणि संध्याकाळची शांतता पाहण्यासाठी तुम्ही पार्टनरसोबत भेट देऊ शकता.