Manasvi Choudhary
आजकाल महिला नवनवीन फॅशन ट्रेंड फॉलो करतात. ऑफिस मिटिंग महिला फॉर्मल लूक करतात. फॉर्मल वेअरमध्ये पॅन्ट किंवा ट्राऊझर्स घालतात.
आकर्षक रंग, परफेक्ट फिटिंग आणि स्ट्रेट पॅटर्नमुळे फॉर्मल पॅन्ट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे ५ लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन्स जाणून घ्या.
सध्या फॅशन विश्वात कोरियन फॅशनचा मोठा ट्रेंड सुरू आहे. हाय-वेस्ट आणि सैलसर पण अत्यंत क्लासी लूक देणाऱ्या या कोरियन स्टाईल ट्राऊझर्स ऑफिस मीटिंग्ज किंवा कॅज्युअल वर्कप्लेससाठी बेस्ट आहेत.
ज्या महिलांना कम्फर्टसोबत स्टायलिश लूक हवा असतो, त्यांच्यासाठी वाईड लेग पॅन्ट्स उत्तम पर्याय आहेत. ही पॅन्ट घातल्यानंतर शरीराला एक परफेक्ट आणि लांबसडक आकार मिळतो.
अँकल लेन्थ पॅन्टसचा कायमच ट्रेंड असतो. या पॅन्ट्स कायम स्टायलिश आणि रिच लूक देतात.
फॉर्मल लूकसाठी क्लासिक स्ट्रेट पॅटर्न कायम ट्रेंडमध्ये असते. नीटनेटके बटन क्लोजर आणि पॉकेट असलेल्या या पॅन्टवर इन करून फॉर्मल शर्ट घातल्यास अत्यंत प्रोफेशनल लूक दिसतो.
ऑफिसमध्ये डेलीवेअरसाठी रेग्युलर फिट फॉर्मल पॅन्ट्स परफेक्ट आहेत. शर्ट आणि टॉप दोन्हींवर हे पॅटर्न सूट होते.