Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Manasvi Choudhary

किचन वास्तूशास्त्र

वास्तुनशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक कोपऱ्याला आणि विशेषतः स्वयंपाकघरा विषयी महत्वाची माहिती दिली आहे. स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याची जागा नसून 'अग्नीतत्वाशी' संबंधित मानली जाते.

Kitchen Vastu Tips

गॅस स्टोव्हच्या आजूबाजूला कोणत्या वस्तू ठेवू नये?

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह हा उष्णता आणि अग्नीचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे अग्नी आणि पाण्याच्या परस्पर विरोधी प्रभावामुळे गॅस स्टोव्हच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी ठेवणे टाळावे, हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kitchen Vastu Tips | yandex

पाण्याची भांडी किंवा बॉटल्स

वास्तुशास्त्रानुसार पाणी आणि अग्नी हे एकमेकांच्या पूर्णपणे विरोधी घटक मानले जातात. गॅस स्टोव्हच्या अगदी जवळ पिण्याच्या पाण्याची भांडी, मडके किंवा पाण्याच्या बाटल्या ठेवणे टाळावे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक तणाव वाढू शकतो.

Water Vessels & Bottles

किचन सिंक

घराच्या चुकीच्या रचनेमुळे अनेकदा गॅस स्टोव्ह आणि किचन सिंक अगदी जवळ असतात. पाण्याचा प्रवाह आणि अग्नी एकत्र आल्याने वास्तू दोष निर्माण होतो. गॅस स्टोव्ह आणि सिंकमध्ये योग्य अंतर असावे.

Kitchen Sink

विद्युत उपकरणे

मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर-ग्राइंडर, टोस्टर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे गॅस स्टोव्हपासून दूर ठेवावीत. सततच्या उष्णतेमुळे या उपकरणांचे नुकसान होऊ शकते आणि वास्तूच्या दृष्टीनेही हे योग्य मानले जात नाही.

Electrical Appliances | Google

ज्वलनशील पदार्थ

कागद, जुनी वर्तमानपत्रे, पुठ्ठ्याचे खोके किंवा प्लास्टिकच्या पिशव्या यांसारख्या सहज पेट घेणाऱ्या वस्तू गॅस स्टोव्हजवळ कधीही ठेवू नका. यामुळे आगीचा धोका उद्भवू शकतो.

Flammable Materials | GOOGLE

स्वच्छतेची रसायने आणि लिक्विड

भांडी घासण्याचे लिक्विड, फ्लोर क्लिनर किंवा इतर रासायनिक उत्पादने गॅस स्टोव्हच्या उष्णतेपासून दूर ठेवावीत. उष्णतेमुळे अशा पदार्थांवर घातक परिणाम होऊ शकतो.

Cleaning Chemicals & Liquids | Feekpick.com

औषधे

बऱ्याच घरांमध्ये जागेच्या अभावामुळे किंवा सवयीमुळे गॅस स्टोव्हच्या आजूबाजूच्या ओट्यावर औषधे ठेवली जातात. मात्र, गॅसजवळ असणारी उष्णता आणि आर्द्रतेमुळे काही औषधांच्या गुणधर्मांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे औषधे नेहमी सुरक्षित व कोरड्या ठिकाणी ठेवावीत.

Medicines | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Honey And Warm Water Benefits
येथे क्लिक करा...