Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

car covered with 3400 lipstick kiss marks : ग्वाल्हेरमध्ये ३४०० लिपस्टिकच्या ओठांच्या ठशांनी सजवलेल्या कारची रील व्हायरल झाली. एका दिवसात ५५ लाख व्ह्यूज मिळाले, मात्र वाहतूक पोलिसांनी कार मालकावर ५५०० रुपयांचा दंड ठोठावला.
Gwalior Kissing Car, Viral Car Reel
Gwalior Kissing Car, Viral Car Reel
Published On

viral kissing car Instagram reel : सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा एक अजब आणि धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून समोर आला आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारवर चक्क ३,४०० हून अधिक 'लिप्स्टिकच्या ओठांचे ठसे' (Kissing Marks) असलेले व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते. या अनोख्या सजावटीमुळे 'कीसिंग कार' म्हणून प्रसिद्ध झालेल्या या वाहनाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच, पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालकावर कठोर कारवाई करत हजारो रुपयांचा ई-चलान (दंडात्मक कारवाई) फाडला आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या कारने रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित केल्याचा आणि वाहतूक धोक्यात आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कार रस्त्यावरून जात असताना लोकांची तुफान गर्दी होत होती आणि अनेकजण तिचे व्हिडिओ बनवत होते. अखेर पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत कारची माहिती काढली आणि चालकाला वाहतूक नियमांचा बडगा दाखवला.

Gwalior Kissing Car, Viral Car Reel
पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

कारवर तब्बल ३,४०० ओठांचे ठसे

इन्स्टाग्राम रील्स बनवणाऱ्या आदित्य सिकरवार याने दिलेल्या माहितीनुसार, एक अनोखी रील तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडने पार्क केलेल्या कारवर लिपस्टिक लावून तब्बल साडेतीन तास ३,४०० ओठांचे ठसे (Kiss Marks) रंगवले. त्यानंतर आदित्यने या कारचा रस्त्यावर भरधाव वेगाने धावतानाचा व्हिडिओ चित्रीत करून इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

Gwalior Kissing Car, Viral Car Reel
आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

एकाच दिवसात ५५ लाख व्ह्यूज, पण...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच प्रचंड व्हायरल झाला आणि अवघ्या एकाच दिवसात या व्हिडिओला तब्बल ५५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. मात्र, हा व्हायरल व्हिडिओ वाहतूक पोलिसांच्या नजरेस पडला. व्हिडिओमध्ये 'MP 07 CC 9452' या क्रमांकाची कार रस्त्यावर भरधाव वेगाने धावताना आणि इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित करताना दिसून आली.

Gwalior Kissing Car, Viral Car Reel
डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास चक्र फिरवत कार जप्त केली आणि वाहतूक पोलीस ठाण्यात आणली. यानंतर पोलिसांनी कार मालक आदित्य सिकरवार याला चौकशीसाठी बोलावले. पोलीस ठाण्यात पोहोचताच आदित्यने आपली चूक कबूल केली आणि "मी पुन्हा अशी चूक करणार नाही" असे म्हणत पोलिसांची माफी मागितली. एवढेच नव्हे तर, त्याने पोलिसांसमोरच स्वतः पाण्याने गाडीवरील लिपस्टिकचे सर्व डाग धुऊन काढले. दरम्यान, मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicles Act) विविध कलमांनुसार कारवाई करत पोलिसांनी ५,५०० रुपयांचा दंड आकारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com