६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Weather Update: ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये पाऊस व बर्फवृष्टीचा अंदाज आहे. दक्षिण भारतासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD WEATHER ALERT: 6 TO 10 OCTOBER RAIN AND SNOWFALL FORECAST
IMD WEATHER ALERT: 6 TO 10 OCTOBER RAIN AND SNOWFALL FORECASTsaam tv
Published On: 

देशातून दक्षिण-पश्चिम मान्सून परतत असतानाच हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या महितीनुसार उत्तर पश्चिम विक्षोभाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 6 ते 10 ऑक्टोबरदरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

IMD WEATHER ALERT: 6 TO 10 OCTOBER RAIN AND SNOWFALL FORECAST
Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

या हवामानात बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता असून दिल्ली आणि एनसीआरमध्ये हवामान बदलणार असल्याचा अंदाज हवामान व्यक्त केला आहे. देशाच्या विविध भागांमध्ये सध्या एकाचवेळी सहा मौसमी हवामान सक्रिय असल्याने जम्मू काश्मीरपासून दक्षिण भारतातील तमिळनाडू आणि पुडूचेरीपर्यंत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

IMD WEATHER ALERT: 6 TO 10 OCTOBER RAIN AND SNOWFALL FORECAST
Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 10 ऑक्टोबरदरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. काही भागांत बर्फवृष्टीसोबत 40 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात 6 ते 11 ऑक्टोबरदरम्यान तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 ऑक्टोबरला किनारी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून काही ठिकाणी 12 ते 20 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो.

IMD WEATHER ALERT: 6 TO 10 OCTOBER RAIN AND SNOWFALL FORECAST
Mumbai Protest: वादग्रस्त व्हिडिओमधील 'ती' व्यक्ती पोलीसच,'मुंबईतील आंदोलनात तरुणीशी गैरवर्तन'

ईशान्य भारतातही पावसाचा जोर

उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगालमधील सूंगाछी येथे 18 सेंटीमीटर, तर तमिळनाडूतील अलकराई इस्टेट आणि कोथागिरी येथे 12 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, केरळ, किनारी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातही 7 ते 11 सेंटीमीटरपर्यंत मुसळधार पाऊस नोंदवण्यात आला आहे.

दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या माघारीची रेषा सध्या बिहारमधील सुपौल, झारखंडमधील रांची, छत्तीसगडमधील रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, महाराष्ट्रातील बारामती आणि हरनाई या भागांतून जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com