पुणे पदवीधर मतदार संघ
२१ उमेदवार
२५ नामनिर्देशन दाखल
पुणे शिक्षक मतदार संघ
२७ उमेदवार
३४ नामनिर्देशन पत्र
आज अखेर
पदवीधर
२९ उमेदवार
३३ नामनिर्देशन पत्र
पुणे शिक्षक
३१ उमेदवार
३८ नामनिर्देशन पत्र
आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं...
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्या... मात्र आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीलाच आग लागली आहे..
रहिवासी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात फटाके ठेवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे...
आग नेमकी कशामुळे लागली? या आगीत किती नुकसान झालं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील करंजकल्ला गावात शेतकरी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले
ऊसाला पाच हजार रुपये भाव देण्याची शेतकऱ्याची मागणी
तोडलेला ऊस घेवुन जाताना गावातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडवला,ट्रॅक्टर अडवत शेतकऱ्याची जोरदार घोषणाबाजी
गेली महीनभरापासुन उसाला पाच हजार भाव देण्याच्या शेतकरी करत आहेत आंदोलन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे एस एम जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पोहचले....
मी तुमच्या रागात सामील व्हायला आलोय
तुमच्याकडे पेपर फुटतायत, आमच्याकडे मत फुटतायत
एकाच बाजूने मन की बात सुरू आहे
धार्मिक गोष्टीत तुम्हाला अडकवले जातेय
जातीपातीच्या भानगडीत पडू नका
विद्यार्थ्यांच्या वेदना आम्हाला समजताय
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मानकिन्ही येथे तलाव पाहणी आणि मच्छीमारांसोबत संवाद साधण्यासाठी मंत्री नितेश राणे दौऱ्यावर आले होते.
मंत्री नितेश राणीच्या ताफ्यासोमर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची जोरदार घोसणाबाजी
दारव्हा ठाकरेसेनेचे तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या शिवसैनिकांनी मंत्री नितेश राणेच्या ताफ्यावर वर कोंबड्या दाखवत निषेध नोंदविला
मुर्गी चोर,मुर्गी आई दुष्काळी दाना चुनने, वोट चोर अशा घोषणाबाजी मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यासमोर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या
मच्छीमारांबाबत एवढीची सहानुभूती असेल तर मच्छीरांना मदत जाहिर करा,अशी मागणी ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली
स्वातंत्र्यानंतर 80 वर्षातही आम्हाला मूलभूत सुविधा जसे रस्ते शाळा इमारती आरोग्य केंद्र पिण्यासाठी स्वच्छ पाणी हे मिळालं नाही, जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही आम्हाला मोठा संघर्ष करावा लागतो असं म्हणत आज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर या परिसरातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हजारो आदिवासींनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी शिंदेचे बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांची भेट घालून दिली. यावेळी संपूर्ण बुलढाणा शहर हे हजारो आदिवासी बांधवांच्या घोषणांनी दुमदुमून निघालं होतं. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने आदिवासींचे मृत्यू होत आहेत. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी या परिसरात रुग्णवाहिका देण्याची ही घोषणा केली.
भाजप युवा मोर्चाच्या नव्या टीमची घोषणा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा
राज्यात एकूण 29 पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा
सर्व पदाधिकारी 35 वयापेक्षा कमी वयोगटातील
शंभवी साळे यांकडे युवती प्रमुख म्हणून जबाबदारी
फ्लाय९१ या विमान कंपनीने नवी मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्ग साठी आपली विमानसेवा सुरू केली आहे. आज 5 ऑक्टोबर पासून फ्लाय९१ या कंपनीने नवी मुंबई विमानतळावर आपले पहिले लँडिंग केले. या नवीन विमानसेवांमुळे मुंबईकर कोकणवासीयांना मुंबईवरून थेट एक ते सव्वातासात कोकणात दाखल होता येणार आहे. गेली दोन वर्षाहून अधीककाळ मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा बंद झाली होती. मात्र आता नवी मुंबई विमानतळावरून पुन्हा ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे पर्यटकांनाही कमी वेळात थेट कोकणात पोचता येणार आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. आमदार गोपीचंद पडळकर, खासदार विशाल पाटील व त्यांच्या पत्नी पूजा पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या सुनबाई स्वाती खाडे आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्या उमेदवारीवर हरकती दाखल झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी पूर्ण झाली. मात्र, निकाल सध्या राखीव ठेवण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्य पंपांवर सकाळपासूनच ‘No Petrol, No Diesel’चे फलक लावण्यात आल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. पेट्रोल संपल्याने नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत असून, काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सणासुदीच्या काळात पुरवठा विस्कळीत झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. टँकर उशिरा येणार असल्याची माहिती पंपचालकांनी दिली असून, पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
\भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील शिवनाळा ते जुनोना मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला. समोरून भरधाव आणि अनियंत्रित आलेल्या दुचाकीला बसने धडक दिल्यानंतर बस थेट शेतात शिरली. या अपघातात दुचाकीस्वार मुरली कोसेकर गंभीर जखमी झाले, तर एसटी बसमधील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. किरकोळ जखमी प्रवाशांवर पवनीतील विविध खासगी रुग्णालयांत उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
सांगलीतील ईश्वरपूरमध्ये 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामेरी रस्त्यावरील लॉजमध्ये शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन दोघांनी अत्याचार केल्याचा आरोप असून, ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शार्दुल विद्यापती पाटील याला पोलिसांनी अटक केली असून, दुसरा संशयित सचिन पाटील फरार आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी प्रथम अटक करण्यात आलेला आरोपी पप्या शिंदे याला आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी न्यायालयाने पप्या शिंदेला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पप्या शिंदेला आता 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्रातील एसआयआरच्या अंमलबजावणीविरोधातील याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. एसआयआरसंदर्भातील याचिकांवर पुढील कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल होताच प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांनी वर्षभरापासून मतदार नोंदणी आणि सहा जिल्ह्यांत संपर्क अभियान राबवल्याचा दावा केला. पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि पदवीधरांचे प्रश्न हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतील, असं वंजारी यांनी स्पष्ट केलं.
सोलापुरातील घाटणे बॅरेजमधून धाराशिवच्या तुळजापूरला पाणी देण्याला मोहोळ तालुक्यातील 10 गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. आज प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची ट्रायल होणार होती; मात्र शेतकऱ्यांनी नदीवर आंदोलन करत ट्रायल रोखण्याचा प्रयत्न केला.
नांदेडच्या हदगावमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर तात्काळ आर्थिक मदतीच्या मागणीसाठी एकवटले. कोरडा दुष्काळ जाहीर होऊनही अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये, तर शेतमजुरांना 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
नंदुरबार रेल्वे स्थानकावर संशयित बेवारस बॅग आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी रंगीत तालीम घेतली. नंदुरबार पोलिस, RPF आणि लोहमार्ग पोलिसांनी समन्वयाने ही प्रात्यक्षिक मोहीम राबवली. बॉम्ब शोधक पथकासह श्वान ‘सिंबा’च्या मदतीने संशयित बॅगेची कसून तपासणी करण्यात आली. या रंगीत तालीमेत सुरक्षा यंत्रणांचा उत्तम समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीतील तत्परता दिसून आली.
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे प्रचंड ट्रॅक्टर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही बोनस न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरसह या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते;परंतु मागील काही काळापासून योग्य मोबदला आणि बोनस न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पूर्व विदर्भातील विविध भागांतून शेतकरी सहभागी झाले होते.जवळपास पाचशेहून अधिक ट्रॅक्टर घेऊन शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३,५०० रुपये हमीभाव देण्यात यावा.धान उत्पादकांना रखडलेला बोनस तातडीने आणि विनाअट देण्यात यावा.अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळण्याबाबत योग्य पावले उचलली जावीत.या ट्रॅक्टर मोर्चामुळे साकोली परिसरातील रस्त्यांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शासनाने जर या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेतील (शिंदे गट) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर सांगोल्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी अवघ्या बारा तासात आपली भूमिका फिरवली आहे.
कालपर्यंत शहाजीबापू पाटील यांनी "माझा पाठिंबा मंगेश चिवटे यांना नसून शिवसेनेला आहे" असे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिलेल्या मंगेश चिवटे यांच्याबाबत पक्षातच नाराजी असल्याची चर्चा रंगली होती.
मात्र आज शहाजीबापू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत
पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी शिवसेनेच्या वतीनं मंगेश चिवटे यांची उमेदवारी झालेली आहे. उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयुक्त कार्यालय पुणे येथे मी स्वतः जाणार आहे. आणि मंगेश चिवटे यांना माझं समर्थन असून त्यांचा मी मनापासून प्रचार करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर -
उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
मच्छीमारांच्या आंदोलनानंतर जलसंपदा विभागाचा निर्णय.
या निर्णयामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेला मोठा दिलासा.
नंदुरबार -
नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक
12 वर्षांपासून अधिकारी एकाच खुर्चीवर शिक्षणासह मूलभूत सुविधांच्या अभावावरून बाळासाहेब मोरे यांचे अन्नत्याग उपोषण...
पेसा भरती, रखडलेले पंचनामे आणि 7 पाड्यांवरील गैरसोयींवरून संताप..
नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर आज धरणे आंदोलन...
जळगाव -
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावातील तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू
दोन गटांत लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
हाणामारी प्रकरणी आधीच १३ जणांविरुद्ध गुन्हा असून १० जणांना अटक करण्यात आलेली आहे
मिलन सोनवणे असे मयत व्यक्तीचे नाव, गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले
जालना -
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना
पुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सायंकाळी 6 वाजता भेट देणार..
जालन्यातील अंकुश नगर येथून मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना...
पालघर -
बोईसर एमआयडीसी परिसरात सुनील ग्रेट प्रोसेसरी या कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक
अमरावतीत महाविकास आघाडीत बिघाडी
ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे -
पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे
हर्षदा जाधव यांना अजून दहा विकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झालेली नाही
महाविकास आघाडी कडून हर्षदा जाधव उमेदवार असण्याची शक्यता
भाजप शिष्टमंडळ पोलीस उपायुक्तांच्या भेटीला
महापौरचे पती कमलेश निकम यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंचेकर गँगचे ऑपरेटर आहेत अस विधान कमलेश निकम यांनी केल होत
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून वाद पेटला शिवसेना-भाजप आमनेसामने
पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कमलेश निकम विरोधात घोषणाबाजी
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आज पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुणे येथील विधान भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात हा अर्ज दाखल केला जाणार असून, यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिल्याचे वृत्त आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांच्या वतीने धडगाव शहरात भव्य इशारा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सातपुड्यातील शेकडो आदिवासी शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.दुष्काळभरपाई त्वरित मिळावी, प्रलंबित फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र तत्काळ देण्यात यावेत, प्रलंबित वन हक्क दावे तातडीने निकाली काढावेत आणि रोजगार हमी योजनेची कामे त्वरित उपलब्ध करून द्यावीत,या प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
डोंबिवलीच्या जिमखाना रोडवरील सागर्ली परिसरात भटक्या कुत्र्याची अमानुषपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या आवारात कुत्र्याला पकडून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या गळ्यात दोरी बांधून फाशी देत हत्या केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी हिर राजपूत यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात सोसायटीतील दोन रहिवासी आणि एका सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील रस्त्याबाबत अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आता आणखी व्हिडिओ याबद्दल समोर आला आहे ज्यामध्ये हाताने डांबर काढलं जातय. पुण्यातील वारजे भागात असलेले सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांनी त्या भागातील नुकताच डांबर घातलेला रस्ता कसा उखडला जातोय याचा थेट "डेमो" दाखवला. वारजे भागातील या रस्त्यावर डांबर टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली खरी मात्र काम इतकं निकृष्ट दर्जाचे झालं की हाताने डांबर काढलं ते निघायला सुरुवात झाली. पुणे महापालिका पुणे शहरातील रस्त्यावरील खड्डे तसेच निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल नेमके काय ठोस पावलं उचलते हे पाहणं या निमित्ताने महत्वाचं ठरणार आहे.
ऊस दराच्या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने आज दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी दिल्ली-नोएडा परिसरात हजारो शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत. सकाळी ११ वाजता जंतर-मंतर मैदानावर आंदोलनाला सुरुवात होणार असून, बळीराजा, स्वाभिमानी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार मैदानात उतरले आहेत.
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावामध्ये जय पवार यांनी गाव भेट दौरा करून कारखान्याच्या सभासदांशी संवाद साधला आहे. 11 ऑक्टोबर रोजी कारखान्यासाठी मतदान होणार असून 12 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
आज जय पवार पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, नाझरे कप, नाझरे सुपे, जवळार्जुन, राख, गुळूंचे, निरा, पिंपरे खुर्द, वाल्हे आणि जेजुरी मध्ये सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
कामगार कायद्यातील बदल रद्द करण्यास अन्य मागण्यासाठी साखर कारखाना कर्मचारी रस्त्यावर
बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढणार मोर्चा
मोर्चासाठी राज्यभरातून साखर कारखाना कर्मचारी कोल्हापूरमध्ये उपस्थित
साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भोर तालुक्यात संस्था प्रतिनिधींच्या ठरावांवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या अ गटातून सलग तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन थोपटे इच्छुक असल्याने भोरच्या राजकारणात ‘थोपटे विरुद्ध थोपटे’ अशी लढत चर्चेत आली आहे.
भाजप नेहमी लबाड कोल्ह्यांच्या भूमिकेत
भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय
घाटकोपरच्या कामराज नगर परिसरात आज सकाळी मालवाहू ट्रकचा मोठा अपघात झाला. सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ट्रक डिव्हायडरला धडकला. धडक इतकी जोरदार होती की ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, या अपघातामुळे परिसरातील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या अपघातग्रस्त ट्रक हटवण्यासह वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठणमध्ये एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत दोन जणांसह पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेवगावकडून पैठणमध्ये आलेली एसटी बस दुचाकीला धडकली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांना गंभीर दुखापत झाली.
बीड जिल्ह्यामध्ये भयंकर अशी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे 50 ते 60 गावांची तहान भागवणारी सिंदफणा नदी कोरडी ठार पडली आहे. सिंदफना नदीतील वाळू गोठे दगड उघडे पडले आहेत तर मोठे मोठे खड्डे दिसू लागले आहेत गतवर्षी याच शिंदफना नदीने आपले रौद्ररूप धारण केले होते अनेक भागांमध्ये पाणी घुसले होते तर दोन्ही बाजूने एक एक किलोमीटर पर्यंत या नदीच पात्र निर्माण झाले होते मात्र यावर्षी वरून राजाने आवक कृपा केल्याने आणि एल निनो प्रादुर्भावामुळे शेतकरी राजा वरती उपासमारीची वेळ आली आहे जनावरे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे
नवापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपचे प्रभारी आणि आदिवासी नेते अजय वसावे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.भाजपचा नेमका नेता कोण हेच त्यांना माहीत नाही. भाजप आदिवासी नेते अजय वसावे यांची लायकी असती, तर त्यांनी नवापूर नगरपालिकेत स्वतःच्या घरातील व्यक्तीला नगराध्यक्षपदासाठी उभे केले नसते, असा घणाघात रघुवंशी यांनी केला. या खालच्या पातळीवरील टीकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, आगामी काळात भाजप आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याने पुन्हा एकदा निवडणूक आणि मतदान याद्यातील गोंधळ पुढे आला आहे, हा सगळा गंभीर प्रकार पदवीधर मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेचे महाविकास आघाडी कडून अधिकृत उमेदवार असलेले दिलीप हरिभाऊ घुगे यांनी
निवडणूक विभागाकडे तक्रार करत तातडीने या मतदार याद्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे, धक्कादायक म्हणजे मतदार यादी मध्ये दोन ठिकाणी उद्धव ठाकरेंचे नाव आढळले आहे
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेऊन शीत पेयातून दारू पाजून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षे विद्यार्थिनीवर दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. याप्रकरणी वाळवा तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.. पीडित विद्यार्थिनी पर जिल्ह्यातील असून येथे शिक्षण घेत होती.. पीडित विद्यार्थ्यानीने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
:धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे चित्र अधिकच अधिकच गडद होत आहे.पावसाच्या आशेवर आणि उपलब्ध पाण्याच्या जिवावर शेतकऱ्यांना फळबागा व भाजीपाला केला मात्र पावसाने दडी मारली आणि उपलब्ध पाणी साठा देखील कमी झाला त्यामुळे अर्धा एकरावरील कोबी प्लॉट ऐन बहरात असतानाच पाणी मिळत नसल्याने मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे.कोबीची वाढ खुंटली व किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे केलेला लाखो रुपये खर्च वाया जाणार आहे.कळंब तालुक्यातील आंदोरा परीसरातील शेतकरी शहाजी तांबारे यांनी संताप व्यक्त केलाय,दुष्काळ जाहीर झाला तो केवळ कागदावर झाला आहे,सरकार फक्त जाहीर करतय देत काहीच नाही अशी संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यंदा अकोला जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी शून्य किलोपासून अवघ्या 40 किलोपर्यंत आलीय. ही परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणच्या पिक कापणी प्रयोगांतून दिसून येत आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्या इतकेही उत्पादन हाती येण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक काढणी आणि लागवन खर्चही निघणार नाहीये. अनेक शेतकऱ्यांसमोर पीक काढायचे की तसेच सोडून द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला
सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाची कमाल कोसळल्या प्रकरणी ठेकेदार व संबंधित दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात निष्काळजी आणि संगनमताने भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी करत संबंधित ठेकेदार ,कोल्हापूर विभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील महेशकुमार कांबळे यांनी केले असून प्रशासनाने यांच्यावर कोणी दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे.
सोलापुरात रंगभवन चौकात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसखाली आल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.रेवप्पा सोमनाथ कांबळे असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. ते एका अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते.ड्युटी संपल्यानंतर रेवप्पा कांबळे हे सायकलवरून घरी जात असताना रंगभवन चौक परिसरात त्यांच्या सायकलला अपघात झाला. यावेळी बसखाली आल्याने गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेनंतर रंगभवन चौकात काही काळ मोठी गर्दी झाली होती. सोलापूर शहरात गेल्या तीन दिवसात दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे..
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौराआज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीला येणार केंद्रातील काही महत्वाच्या नेत्यांच्या घेणार भेटीगाठी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा होणार दौरा महत्वाचासूत्रांची माहिती
- महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या मालमत्ता कर विभागांशी संबंधित कर्मचाऱ्यांना पाचारण करून करवसुलीसाठी ४१ दिवसाची विशेष मोहीम राबविण्यात आली.
- या मोहिमेबाबत मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी घेतल्या अनेक बैठका.थकबाकीदारांवर कोणतीही दयामया न दाखविण्याच्या दिल्या होत्या सूचना..
उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसीलदार,तलाठी,कृषी अधिकारी शेतीचे पंचनामे करण्यासाठी बांधावर दाखल..
उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश खरीप पीक झाली आहेत मातीमोल,
पाण्याविना तूर पिकाची वाढ खुटली
शेतीच्या दाहक परिस्थितीचा पंचनामा करून अधिकारी घेतायत आढावा
उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर भागातील शेतीचा पंचनामा सुरु असताना लवकरातलवकर शासनाकडून मदत मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा
खरीप पीक पुरत वाया गेल्यामुळे हातचा 'विळा ही गेला आणि भोपळा ही गेला' आशा व्यक्त केल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भावना
पावसाने पाठ फिरवताच यवतमाळ जिल्ह्यात ऋतूचक्राने अचानक कलाटणी घेतली असून गेले काही दिवस आल्हाददायक वाटणाऱ्या वातावरणात आता तीव्र उन्हाच्या झळा जाणू लागल्यात यामुळे नागरिकांना ऑक्टोंबर हीट चा सामना करावा लागत आहे.रविवारी पारा 35.2 अंशावर गेला होता,पुढील दोन दिवसात तापमान 37 अंशावर पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तीन वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे.
रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये अजूनही खटके उडत असून आलबेल नसल्याचं चित्र आहे. विकास कामांच्या श्रेयावरून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं होत. आपण निधी दिलेला असताना त्याचं उद्घाटन तटकरेंनी केलं, त्या कार्यक्रमाला सुद्धा बोलावलं नाही नसल्याचा आरोप आ. दळवी यांनी सुनिल तटकरे यांच्यावर केला होता. त्याला आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका आल्याकी तटकरे यांच्या पायाशी येतात निवडणूक संपली की कोण तटकरे असं विचारू लागतात. आमची जर मतदार संघात ताकद नसेल तर आमच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा लोकांच्या विकासकामांकडे लक्ष द्या, असा सल्ला अनिकेत तटकरेंनी दळवींना दिला. आमचं काम हाथी चाले बाजार ..... या पद्धतीने सुरू असतं असंही ते म्हणाले. यापुढे टीका झाली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही अनिकेत तटकरे यांनी दिला आहे.
पुणे शिक्षक मतदार संघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंढरपूर येथील डाॅ.बी.पी रोंगे यांनी बंडाचे निशाण फडकावले. रोंगींच्या बंडखोरीमुळे पुणे शिक्षक मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान बी.पी. रोंगे आज सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्याला रवाना झाले.
छत्रपती संभाजी नगर शहरातील सातारा, देवळाई परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी सकाळी साडेदहाला देवळाई परिसरातील हरिओमनगर येथील पाण्याच्या टाकीच्या खाली परिसरातील नागरिक एकत्र येत धरणे आंदोलन केले. सातारा देवळाईवासीयांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सातारा देवळाई परिसरातील भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, बहुतांश बोअरवेल आटल्याने नागरिकांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. तसेच परिसरातील पाण्याच्या टाकीत उपलब्ध असलेले पाणी खासगी टँकरद्वारे कमी दरात नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, तसेच भूमिगत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनला नळजोडण्या द्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, आंदोलनातील काही नागरिक पाण्याच्या टाकीवर जाऊन घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मागण्या तातडीने मान्य न केल्यास आगामी काही दिवसांत देवळाई चौकासह धुळे-सोलापूर महामार्ग बंद करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी उपस्थित होते.
-लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाताना दिसत आहे, शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीत, एका दुकानांमध्ये मध्य धुंद तरुणाचा राडा पाहायला मिळाला. दुकानात दुचाकी घालत, दुकान चालकाला आणि ग्राहकांना शिवीगाळ करत धनकवल्याची माहिती समोर आहे. दरम्यान लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवर्तिच्या घटना वाढत जात असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे
कोकणातील आंबा बागायतदारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असलेल्या ई-पीक पाहणीतील वाणांच्या नोंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाच्या DCS अॅपमध्ये आंबा पिकाची नोंद करताना मूळ 'हापूस'ऐवजी 'कोकण रुची' असा पर्याय दिसत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संभ्रम व असंतोष पसरला आहे. ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.. प्रत्यक्ष शेतात हापूसची लागवड असताना सरकारी डिजिटल नोंदीत त्याची स्वतंत्र ओळख न दिसणे ही केवळ तांत्रिक चूक नसून भविष्यातील कृषी नियोजन, पीक विमा, शासकीय भरपाई व योजनांवर परिणाम करणारी गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रश्नावर कोकणातील युवा शेतकरी नेतृत्व तथा अधिवक्ता अॅड. ज्ञानेश पोतकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. डिजिटल पीक पाहणीत हापूसची स्वतंत्र नोंद असणे हा बागायतदारांचा अधिकार आहे. हापूससोबतच केशर, पायरी, रत्ना, सिंधु या आंब्याच्या जाती तसेच काजू, कोकम व इतर फळपिकांचीही स्वतंत्र नोंद प्रणालीत उपलब्ध झाली पाहिजे," असा ठाम आग्रह अॅड. पोतकर यांनी धरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.