Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

Shreya Maskar

चार्लोट लेक

चार्लोट तलावाच्या सभोवतालची दाट हिरवाई, शांत वातावरण आणि पावसाळ्यातील निसर्गरम्य दृश्ये पिकनिकसाठी आकर्षक ठरतात. तलावाजवळ पिसारनाथ मंदिरही आहे. हे माथेरानच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत आहे.

Charlotte Lake | google

इको पॉइंट

नावाप्रमाणेच या ठिकाणी आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला मिळतो. आजूबाजूला खोल दऱ्या आणि हिरव्यागार डोंगरांचे सुंदर दृश्य दिसते. मुलांसोबत जाणाऱ्या कुटुंबांसाठी हे एक मजेशीर थांबे ठरू शकते.

Echo Point | google

लुईसा पॉइंट

लुईसा पॉइंट हा माथेरानमधील प्रसिद्ध व्ह्यू पॉइंट आहे. येथून खोल दऱ्या, सह्याद्रीच्या रांगा आणि प्रबळगड परिसराचे दृश्य पाहता येते. सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणचे वातावरण विशेष सुंदर दिसते.

Louisa Point | google

वन ट्री हिल पॉइंट

वन ट्री हिल पॉइंटचे वैशिष्ट्य म्हणजे टेकडीच्या माथ्यावर दिसणारे एक झाड. हिरव्यागार जंगलातून चालत या पॉइंटपर्यंत जाण्याचा अनुभवही खास आहे. ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

One Tree Hill Point | google

मंकी पॉइंट

मंकी पॉइंटवरून हिरव्यागार डोंगर-दऱ्यांचे दृश्य दिसते आणि परिसरात माकडेही आढळतात. त्यामुळे खाण्याचे पदार्थ उघड्यावर किंवा हातात घेऊन माकडांच्या जवळ जाणे टाळावे.

Monkey Point | google

पोर्क्युपाइन पॉइंट

पोर्क्युपाइन पॉइंटला Sunset Point असेही म्हटले जाते. सूर्यास्ताच्या वेळी आकाशात पसरणारे रंग आणि खाली दिसणाऱ्या दऱ्या यामुळे हे ठिकाण विशेष आकर्षक दिसते. संध्याकाळच्या पिकनिकसाठी हा लोकप्रिय पर्याय आहे.

Porcupine Point | google

पॅनोरमा पॉइंट

पॅनोरमा पॉइंटला माथेरानचा प्रसिद्ध Sunrise Point म्हणूनही ओळखले जाते. येथून डोंगर, दऱ्या आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे विस्तीर्ण दृश्य दिसते. सूर्योदयाच्या वेळी आकाशातील रंग आणि धुक्याने वेढलेले डोंगर पिकनिकचा अनुभव अधिक खास बनवतात.

Panorama Point | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : अंधाऱ्या बोगद्यातून वाट काढत पोहचा 'या' धबधब्यावर, मुंबई-पुण्याजवळच पाहाल हे आरस्पानी सौंदर्य

Mumbai-Pune | AI PHOTO
येथे क्लिक करा...