Crime : घराला कुलूप लावून बाहेर पडताय? सावधान! मुंबईतील 'या' चोराची मोडस ऑपरेंडी ऐकून चक्रावून जाल

Mumbai Goregaon burglary news : गोरेगाव पश्चिमेतील घरफोड्यांची मालिका CCTVच्या एका महत्त्वपूर्ण क्ल्यूमुळे उघडकीस आली. बांगूरनगर पोलिसांनी सात गुन्ह्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या संशयितासह दोन साथीदारांना अटक करून सोने, रोकड व इतर मुद्देमाल जप्त केला.
Goregaon burglary case latest news
Goregaon burglary case latest newsSaam TV Marathi
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Goregaon burglary case latest news : गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंग नगर परिसरात घरफोड्यांची मालिका करणाऱ्या आरोपीला अखेर बांगूरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत घरफोड्या करणाऱ्या या आरोपीने तब्बल सहा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना कोणताही ठोस पुरावा दिला नव्हता. मात्र, सातव्या गुन्ह्यानंतर घटनास्थळावरून पळताना तो CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आणि याच एका फुटेजच्या आधारे पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

पोलिसांनी शब्बीर सलीम खान (२९, रा. आंबुजवाडी, मालवणी) या संशयिताला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सात चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे.

सहा गुन्ह्यांत मोबाईल लोकेशनचा धागा

सातव्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित आरोपी घटनास्थळावरून निघून जाताना दिसून आला. त्याची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनच्या लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले. या विश्लेषणात फेब्रुवारी ते जुलैदरम्यान झालेल्या मागील सहा चोरींच्या घटनांच्या वेळी आरोपीचा मोबाईल संबंधित परिसराच्या आसपासच असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Goregaon burglary case latest news
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचे मोठे पाऊल; २९ ऑगस्टला मुंबईत निर्णय

घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर नजर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सायंकाळच्या वेळी निवासी भागात रेकी करत असे. नागरिक भाजीपाला, किराणा किंवा अन्य आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधून तो बंद घरांची पाहणी करायचा. घराला कुलूप असल्याचे निश्चित झाल्यानंतर तो घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सात घरफोड्यांमध्ये सुमारे ६९ तोळे सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Goregaon burglary case latest news
Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

सातव्या गुन्ह्यात CCTV ठरला निर्णायक

१५ जुलै रोजी गोरेगाव पश्चिमेतील एका घरात घरफोडी झाली. घरातील रहिवासी सायंकाळी बाहेर गेले होते. रात्री ७ ते ८:४५ वाजेच्या सुमारास ते परतल्यानंतर घराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील लोखंडी कपाट आणि लॉकर फोडून आरोपीने सुमारे १०५.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक मोबाईल फोन आणि ८० हजार रुपयांची रोकड असा सुमारे ५.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाच्या तपासात CCTV फुटेज हाती लागल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Goregaon burglary case latest news
९० कोटींच्या घोटाळ्यात मंत्री अडकला, सीबीआयचा थेट राज्यपालांकडे अर्ज, राजकारणात खळबळ

दोन साथीदारांनाही अटक

तपासादरम्यान आरोपीने चोरीचा मुद्देमाल आपल्या दोन साथीदारांकडे दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद आसिफ आदिल खान उर्फ सिब्लू (२६) आणि मुस्तफा इसा सिद्दीकी उर्फ भुवर (३४) या दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून १८ तोळे सोने, ७४ हजार रुपयांची रोकड, एक ॲक्टिव्हा स्कूटर आणि दोन मोबाईल फोन असा एकूण सुमारे १७.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई परिमंडळ-११ च्या पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बांगूरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या 'डिटेक्शन टीम'ने केली आहे. आरोपींच्या अधिक चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com