Ahmedabad Airplane Crash X
देश विदेश

Ahmedabad Airplane Crash मध्ये २७४ जणांचा मृत्यू, 'त्या' ३३ जणांच्या कुटुंबियांना देखील १ कोटी रुपये मिळणार

Airplane Crash : अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. यामध्ये विमान ज्या नागरी वस्तीवर कोसळले, तेथील लोकांचा देखील समावेश आहे.

Yash Shirke

Plane Crash : अहमदाबादमधील विमान दुर्घटनतील मृताची संख्या २७४ वर पोहोचली आहे. यात विमानातील प्रवासी, क्रू मेंबर्स, पायलट यांच्यासह अन्य सामान्य नागरिकांचाही देखील समावेश आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान मेघानीनगरमधील एका निवासी डॉक्टर्सच्या हॉस्टेलवर कोसळले होते. हॉस्टेलमधील आणि त्याच्या आसपास असणारे जे लोक अपघातात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपद्वारे भरपाई दिली जाणार आहे.

एअर इंडियाचे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर धडकले. अनेक डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि हॉस्टेलजवळ राहणाऱ्यांचा जीव अपघातात गेला. तेथील मृताची संख्या ३३ आहे. या ३३ जणांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई टाटा ग्रुपने जाहीर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च देखील टाटा ग्रुप उचलणार आहे. मेडिकल हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठीही टाटा ग्रुप मदत करणार आहे.

एअर इंडियाच्या विमानामध्ये २४२ जण होते. यात प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि २ पायलट यांचा समावेश होता. यातील एकमेव प्रवासी बचावल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि त्याच्या आसपास ३३ जणांचा बळी गेल्याची शक्यता आहे. या सर्वांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे.

१ कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना विमा कंपन्यांकडून सुमारे १.५ कोटी रुपये भरपाई म्हणून मिळतील. एअर इंडियाच्या पॉलिसीसाठी टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स (४०% पेक्षा जास्त हिस्सा असलेली मुख्य कंपनी), आयसीआयसीआय लोम्बार्ड, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स आणि काही सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या काम पाहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुच

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT