Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, भर रस्त्यात वेगात येणाऱ्या कारनं चिरडलं अन्...; लेकीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

Pune Accident News : पुण्यातील कात्रजमध्ये भीषण अपघात घडला आहे. वेगाने येणाऱ्या व्हॅगनार कारने एका २१ वर्षीय तरुणीला चिरडले. या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Accident
Pune Accident x
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्याच्या कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव येणाऱ्या व्हॅगनार कारने एका तरुणीला चिरडले आहे. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया गौतम येवले (वय २१) या तरुणीचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही तरुणी शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा येथे राहत होती. कात्रजमधील सुखसागरनगर येथे तिला व्हॅगनार कार चिरडले. या कार अपघातामध्ये श्रेया येवले या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

Pune Accident
Gautam Gambhir ने अचानक सोडली भारतीय संघाची साथ, तडकाफडकी घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय; कारण...

कार अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो गोकुळनगरचा रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. भरधाव कारने दिवसाढवळ्या तरुणीला चिरडल्याने कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Accident
Plane Crash: लंडनला स्थायिक होण्यासाठी डॉक्टर दांपत्य ३ मुलांसह निघाले, विमान टेकऑफ होण्याआधी सेल्फी काढला, पण तोच शेवटचा ठरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com