Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार, नवले पुलाजवळच्या नाल्यात महिला पडली, क्षणात वाहून गेली; नंतर...

Pune News : पुण्यात काल (१२ जून) रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. याचदरम्यान एक वयस्कर महिला नवले पुलाजवळच्या नाल्यात वाहून गेली. ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह वारजे स्मशानभूमीजवळच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.
Pune News
Pune News x
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील नवले पुलाजवळ असलेल्या नाल्यात एक वयोवृद्ध महिला वाहून गेली होती. त्या पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. वारजे स्मशानभूमीजवळ पाण्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोभा मनोहर महिमाने या ६५ वर्षीय आजी नवले पुलाजवळ असलेल्या नाल्यात काल (१२ जून) रात्रीच्या सुमारास वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह वारजे स्मशानभूमीजवळ आढळला. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोभा यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, भर रस्त्यात वेगात येणाऱ्या कारनं चिरडलं अन्...; लेकीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

शोभा महिमाने या मुळच्या फुरसंगी येथील रहिवासी आहेत. त्या कोल्हापूर ते पुणे असा प्रवास करुन पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर शोभा बंगळुरू महामार्गावरील पुलावरुन उतरल्या. रिक्षा पकडण्यासाठी त्या रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आल्या. रस्ता ओलांडत असताना शोभा रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडल्या. नाल्याच्या पाण्यात त्या वाहून गेल्या.

Pune News
Gautam Gambhir ने अचानक सोडली भारतीय संघाची साथ, तडकाफडकी घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय; कारण...

सुमारे दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री पुण्याला विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामान होते. पावसाची शक्यता कमी वाटत असतानाही रात्री दहानंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर आणि परिसरात काही वेळातच पावसाने कहर केला. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Pune News
Air India चं विमान मेसमध्ये घुसलं, आई आणि दोन वर्षांच्या लेकीला शोधण्यासाठी रवीची जीवघेणी धडपड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com