Officials seize illegal hydrocarbon petroleum stock during a major vigilance raid in Usatne village, Kalyan.  saam tv
मुंबई/पुणे

तेलाच्या टँकरमध्ये पेट्रोलियमचा काळाबाजार! १.२० कोटींचा अवैध साठा जप्त; अन्न व नागरी पुरवठा विभागाची मोठी कारवाई

Illegal Hydrocarbon Storage In Usatne Village Kalyan: ठाणे जिल्ह्यातील उसटणे गावात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाची मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

ठाणे जिल्ह्यातील उसटणे गावात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थांवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

खाण्याच्या तेलाच्या टँकरचा वापर करून त्यामध्ये हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थांची अवैधरित्या साठवणूक व विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती राज्य दक्षता पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने उसटणे गावातील संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांचा साठा तसेच त्यासाठी वापरण्यात येणारी वाहने आणि अन्य साहित्य आढळून आले. नियंत्रक शिधावाटप अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्य दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून अवैध साठा जप्त केला. प्राथमिक तपासात या पदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईबाबत माहिती देताना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी रामराजे भोसले यांनी सांगितले की, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून पेट्रोलियम पदार्थांचा अवैध साठा व व्यापार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्य दक्षता पथक सातत्याने कारवाई करत असून पुढील काळातही अशा धडक मोहिमा सुरू राहणार आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध पेट्रोलियम व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT