पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे छापा टाकण्यात आलाय.
बेहिशोबी संपती जमवलेल्या प्रकरणी छापा टाकण्यात आला असून पंढरीनाथ साबळे यांनी केली होती तक्रार.
पुणे महापालिकेतील बनावट नोकरभरती घोटाळ्यात पोलिसांची कारवाई
घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार राजेंद्र खेडेकरला अटक
शिवाजीनगर पोलिसांनी आज दुपारी राजेंद्र खेडेकरला अटक केली
महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शेकडो युवकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप
राजेंद्र खेडेकर आणि त्याच्या टोळीविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल
गेल्या दोन महिन्यांपासून राजेंद्र खेडेकर फरार होता.
मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल होणार
आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सरकार काय आश्वासन देणार याकडे लक्ष
अंधेरी सबवेमध्ये तब्बल तीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक बंद
मुंबईत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला
अंधेरीसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले
अंधेरी सबवे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम
वाहनचालकांनी अंधेरी सबवेमार्गे जाणे टाळावे, पर्यायी मार्गाचा वापर करावा
मुलुंड भांडुप नाहूर विक्रोळी घाटकोपर विभागात पाऊस
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर संध्याकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात
पाऊस पडल्यामुळे वातावरणात थंडावा
काही दिवसापासून मुंबईत उन्हामुळे गर्मी झाल्यामुळे नागरिक त्रस्त मात्र आज पावसाने दिला गारवा
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना महत्त्वाची माहिती दिली. जोपर्यंत साखरेला ५० रुपये किलो हमीभाव आणि सी-हेवी इथेनॉलला ७० रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने सुरू केले जाणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
दुपारी १२ ते २ या कालावधीत वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणार ब्लास्टिंग
या कामामुळे दुपारी 12 ते दुपारी 14 वाजेपर्यंत दिवेघाट रस्ता वाहतूक पूर्णतः बंद राहणार
या कालावधीत नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक विभागाचे आवाहन
नागपुर जिल्हा 14 तालुके दुष्काळ जाहीर.
अमरावती सर्व 14 तालुके जाहीर
वाशीम सर्व 6 तालुके जाहीर
अकोला सर्व 7 तालुके जाहीर
बुलढाणा सर्व 13 तालुके जाहीर
यवतमाळ सर्व 16 तालुके जाहीर
विणेगाव, भिलवली चौक परिसरात मेघ गर्जनेसह पाऊस
पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत
खालापूर तालुक्यातील मिळ गावात वाऱ्यामुळे घरांचे छप्पर उडाल्याची घटना
विजेचे खांब उन्मळून पडल्याने विज पुरवठा खंडीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून धनादेश सुपुर्द
मुख्यमंत्री सहाय्यत निधीमध्ये ११ लाख रुपयांचा निधी देणगी स्वरुपात सुपुर्द
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाबाबत दिली माहिती.
कर्तव्यात कसूर, नेमून दिलेल्या ठिकाणी काम न करणे, आणि अनियमित या कारणामुळे बीड जिल्हा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा कारागृह व्हीआयपी ट्रीटमेंट, तसेच बंदी मधील वाद, आणि इतर कारणामुळे चर्चेत होते.
शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी एक लाख रुपये तातडीने जमा करा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पक्षाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात आणि खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
कारेगाव परिसरात हमजा शेख यांच्यावर अज्ञात दोन व्यक्तींनी गोळीबार करुन दुचाकीवरून फरार झाले असुन रांजणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराचं नेमकं कारण आणि हल्लेखोर कोण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली येथील सोगेती एडीएम संस्फेन्सेन कंपनीला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी एमआयडीसीचे दोन आणि चाकण नगरपरिषदेचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आहे. आग आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणताना अडचणी येत आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भांबोली येथे एमआयडीसीचे कार्यालय होत असून, या ठिकाणी कायमस्वरूपी अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
गणेशोत्सवानंतरची पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने रांजणगावच्या महागणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. अंगारकीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविक दाखल झालेत.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी दिल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील शेतकरी अरुण चक्के यांनी दीड एकरातील झेंडूची बहरलेली फुलशेती अखेर रोटावेटर फिरवून नष्ट केली. दसरा-दिवाळीसाठी लागवड केलेली झेंडूची बाग पाण्याअभावी डोळ्यादेखत वाळून जात असल्याने त्यांनी हा कठोर निर्णय घेतला. पिकासाठी केलेला खर्च आणि मेहनत वाया गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून, पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची पिकं सुकल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सोयाबीनसह इतर पिकं करपल्याने आगामी काळात कोरड्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. पाण्याअभावी हिरवा चाराही उपलब्ध होत नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिकांचं नुकसान आणि चारा टंचाईच्या दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा, तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
देशातून फरार असलेला निलेश घायवळ याला 2020 मधील खंडणी प्रकरणात पुण्याच्या विशेष MCOCA न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. घायवळ कारागृहात असताना त्याच्या साथीदाराने रॅलीसाठी जीप हवी असल्याचे सांगत खंडणी मागितल्याचा आरोप होता. या प्रकरणातील फिर्यादीने पोलिसांवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप करत दबाव टाकून फिर्याद नोंदवल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते.
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेल्या तालुक्यांचा निकषांच्या आधारे पुन्हा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या तापी नदीवरील हातोडा पुलाची अवस्था धोकादायक बनली आहे. 2016 मध्ये सुमारे 35 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या पुलावर मोठे खड्डे आणि ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या तब्बल 11 ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, परिसरातील मोठ्या प्रमाणातील वाळू उपशामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील सत्र न्यायालयाकडून माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर
सुमारे साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर जामीन
अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे आरोपी
दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा जामीन देताना न्यायालयासमोर महत्त्वाचा ठरला
सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी कदम यांनी केली. राज्य सरकारने सांगली जिल्ह्यातील दहा पैकी चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी ही मागणी केली असून, ते सांगलीमध्ये बोलत होते.
धाराशिवमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लवकरच मदत करण्यात येणार आहे. मंदिराच्या सर्व विश्वस्तांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिली. यापूर्वीही पूरपरिस्थितीत मंदिर संस्थानने मदत केली होती.
पुण्यातील इतर मागास बहुजन विभागासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. एसीएपी (Against CAP Round) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारण्यात आल्याने ही शिष्यवृत्ती मिळावी, या मागणीसाठी अभाविपने आंदोलन केले.
मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्यावर काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी टीका केली आहे. ‘आमचा मुलुंडचा आमदार चोरीला गेला आहे’, अशी तक्रार त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात केली. महिनाभरापूर्वी आमदार मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमधील एक डीपी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा पुन्हा पाठपुरावा केला नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला.
विकासक आणि आमदार यांच्यात सेटलमेंट झाल्यामुळे आमदारांनी हा विषय पुन्हा मांडला नाही आणि पाठपुराव्यासाठी पोलीस ठाण्यातही आले नाहीत, असा दावा राकेश शेट्टी यांनी केला. त्यामुळे आमदारच चोरीला गेल्याची तक्रार आपण मुलुंड पोलीस ठाण्यात करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा भिवंडीत पूर्ण करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावाजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर बसवण्यात आला आहे. या पुलाची लांबी १०० मीटर असून त्याचे वजन तब्बल १,४०५ मेट्रिक टन आहे.
या स्टील पुलाची उंची १४ मीटर, तर रुंदी १४ मीटर आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामातील हा महत्त्वाचा भाग असून, महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हा पूल बसवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर पुनर्विकासाच्या कामासाठी १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. आरएलडीएच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या टप्पा-१ अंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ आणि स्टेब्लिंग लाइन १५ वर पायाभरणीचे काम करण्यात येणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे.
या ब्लॉकच्या कालावधीत निवडक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे दादर आणि ठाणे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची आणि संबंधित सूचनांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या समर्थकांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांचं लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांबाबत कोणतेही ठोस पुरावे नसताना विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोप भाजप आमदार राजेश पाडवी यांनी केला. निवडणूक आयोगात कोणताही अंतर्गत वाद नसून, सर्व निर्णय आणि निवडणुकीचे वेळापत्रक एकत्रितपणे ठरवले जाते, अशी माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी पाडवी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी संविधानाचा आधार घेत चुकीची माहिती पसरवत असून, संविधानाने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगासारख्या संस्थांचा सन्मान राखला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच एका अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्तीच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढून ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून राजकीय आंदोलने केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जंतर मंतर येथील आंदोलन साठी आम्ही पाठिंबा दिला होता
पण प्रत्येक जण प्रत्येकांच्या व्यासपीठावर गेले पाहिजे असे नाही
प्रत्येक जण आपला पद्धतीने आंदोलन करत आहे..
मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे झेंडे नसणार
सर्वांच्या हाती केवळ तिरंगा असेल
भ्रष्ट निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत एल्गार
सत्ताधारी पक्षाला यायचं असेल तर त्यांनी यावं
४ ऑक्टोबर रोजी ज्ञानेश कुमारांविरोधात संयुक्त मोर्चा निघेल
भायखळा ते मुंबई सीएसएमटीपर्यंत निघणार मोर्चा
मुंबई महापालिकेसमोर सांगता सभा होणार
पुणे -
पुण्यात वडगाव शेरीत मोकाट सोडलेल्या लॅब्रेडॉर कुत्र्याचा १२ वर्षीय मुलावर हल्ला
अर्णव नावाच्या मुलाच्या चेहऱ्याला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना
हल्ल्यात मुलाच्या ओठाजवळ गंभीर दुखापत चेहऱ्यावर आठ टाके
२६ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरासमोर खेळताना हल्ला,मुलाच्या आरडाओरडीनंतर वडिलांनी धाव घेत कुत्र्याला हाकलून दिले
जखमी मुलावर वडगाव शेरीतील नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहेत.
लातूर -
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या निधीवरून सरपंच आणि उपसरपंचांमध्ये वाद
पंचायत समिती परिसरात एकमेकांना शिवीगाळ.
अहमदपूरच्या थोडगा गावातील प्रकरण
मुंबई -
आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक
आझाद मैदानावर मातंग समाजाचा मोर्चा
सीएसटी येथील रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला
पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न
बारामती -
दौंड शहरातील शिवसागर ट्रेडिंग दुकान परिसरातून तब्बल १ लाख ४० हजार ९०० रुपये किमतीच्या सिगारेटच्या ३२ बॉक्सची पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली.
२८ सप्टेंबर रोजी दुपारी हा प्रकार घडला असून, बारामतीहून माल घेऊन आलेल्या व्यापाऱ्याने दुचाकीजवळ पिशवी ठेवून दुकानात प्रवेश केला असता चोरट्याने संधी साधली.
पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश
पुनर्वसन आधी, जलवाहिनी नंतर शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
2 ऑक्टोबरला जलसमाधी आंदोलन होणारच
जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली
रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा खोळंबा
धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
स्थानिक पशुधनासाठी चारा राखण्याला प्राधान्य,उल्लंघन केल्यास वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई
अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमी परिसरात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
२८ सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
हुबळीत प्रल्हाद जोशींच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी हुबळीच्या दिशेने रवाना
बोरीवली पश्चिम, आय.सी. कॉलनीतील ‘छोटूस किचन’मध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर
रेस्टॉरंटमध्ये ५ ते ६ उंदीर फिरत असल्याचा मनसेच्या किरण नकाशे यांचा दावा
ग्राहक जेवत असतानाच हॉटेलच्या शटर वर उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत असल्याचा दावा
अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा
लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटना
मोबाइल चोरी व गहाळ होण्याच्या २०० हून अधिक तक्रारी पोलिसांकडे दाखल
पोलिसांकडून १९२ मोबाइल गहाळ झाल्याची अधिकृत नोंद
मोबाइल आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी १० स्वतंत्र गुन्हे दाखल
- नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची होणार पुन्हा पाहणी
- जिल्ह्यातील दुष्काळी यादीत समावेश नसलेल्या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी होणार
- चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये पुन्हा होणार पाहणी
- सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी
- सप्तशृंगी गडाचा रस्ता १ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार
- सप्तशृंगी गड ते नांदुरी घाटमार्गावरील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे घाट रस्ता राहणार बंद
जळगाव-मुंबई विमानसेवा रोज होण्याची शक्यता
'फ्लाय ९१'कडून सेवाविस्ताराच्या हालचाली
बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्री दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे आहेत.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राजहंस चौकात अनिकेत धुमाळ आणि पप्पू जगताप या दोन युवकांना एका टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यावेळी दोन्ही युवकांवर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कात्रज डेअरीची वार्षिक 67 वी सर्वसाधारण सभा संपन्न
कात्रज दूध डेअरीला चालू वर्षात एक कोटींचा निव्वळ नफा
कात्रज दूध डेअरीच्या 57 वार्षिक सर्वसाधारण सभेत माहिती
कात्रज डेअरीची 2025 26 आर्थिक वर्षाची संघाची उलाढाल 387 कोटींवर
जालना शहरातील रेल्वेस्थानक रस्त्यावरील सत्तर टपऱ्यांवर हातोडा
शहरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात महापालिकेची कारवाई
राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा आज राज्यस्तरीय शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ
मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आला आहे
राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभाचे आयोजन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.