Maharashtra Politics: शरद पवार गटाच्या 'त्या' तीन आमदारांवर कारवाई होणार? काय आहे प्रकरण?

Sharad Pawar Group MLa : विधान परिषद निवडणुकीदरम्यान मोठी घडामोड झाली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील तीन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेत.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV Marathi News
Published On
Summary
  • राष्ट्रवादी शरद पवार गटातील तीन आमदारांनी भाजपच्या बैठकीला हजेरी लावल्याची चर्चा.

  • संबंधित आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप.

  • प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कारवाईचे स्पष्ट संकेत दिले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठ्या राजकीय घडमोडी घडल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार आमदारांपैकी तीन आमदारांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला हजर लावली होती. नुसती हजेरी नाही तर त्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा देखील दिला. आता या आमदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तसेच संकेत माध्यमांशी बोलताना दिलेत.

Sharad Pawar
तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

बंडखोर आमदारांबाबत निवडणुकीनंतर पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे. सोलापूरमध्ये महायुतीचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होतेय. येथील निवडणूक बिनिवरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रयत्न केले. मात्र, खासादर धैर्यशील मोहिते पाटलांच्या पुढाकाराने ही निवडणूक लागली आहे.

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होता. त्यासाठी वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला. आपल्याकडे 600 अदृश्य मतं असल्याचा दावाही त्यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात केला.

Sharad Pawar
Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; सोलापुरातील बडा नेता पक्षाला रामराम ठोकणार?

मात्र धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडलेत. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील तीन आमदारांनी भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलाय. येथील निवडणुकीसाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर देखील इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती,त्यामुळे उत्तम जानकर नाराज होते. दुसरे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकीची नाराजी बोलून दाखवली.

वसंतराव देशमुख यांनी पंचायत समितीवेळी भाजपला मदत केल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, पक्षात असणारे मतभेद बाहेर बोलणे किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन मदतीबाबत आश्वासन देणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणालेत. विधानपरिषद निवडणुकीत आता पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांना पक्षाच्या उमेदवारासोबत राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे. मात्र, कारवाईबाबत आपण अद्याप काही बोलणार नसून निवडणुकीनंतर पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल, असेही शशिकांत शिंदे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com