तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Warn To Government: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीवरून सरकारला इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil Warn To  Government:
Maratha activist Manoj Jarange Patil has strongly opposed any move to transfer FDA Commissioner Tukaram Mundhsaam tv
Published On
Summary
  • FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी मोहिमेची राज्यभर चर्चा.

  • भेसळखोरांविरोधात मकोका लावण्याचे आदेश दिल्याने खळबळ.

  • मनोज जरांगे पाटील यांनी मुंढेंच्या संभाव्य बदलीला विरोध दर्शवला.

बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात उगारलेला कारवाईचा बडगा चर्चेचा विषय ठरतोय. एफडीएच्या धाडीचा अनेकांना धास्ती लागली आहे. अन्न पदार्थात भेसळ केलेली आढळून आली तर थेट मकोका लावण्याचे आदेश तुकाराम मुंढेंनी दिलेत. मुंढेंच्या धडक मोहिमेचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. मात्र पूर्वानुभव लक्षात घेता तुकाराम मुंढेंच्या बदलीची लगोलग चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil Warn To  Government:
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा राज्यभरात धडाका; शिर्डीनंतर शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDAचा छापा

सरकारनं तुकाराम मुंढे याच्या बदलीचे धंदे बंद करावे त्यांना याच विभागात राहू द्या भेसळ करणाऱ्यांना नीट करतील. मुंढे यांची बदली करण्याच्या भानगडीत पडल्यास मी सरकारच्या मागे लागेल असं जरांगे पाटील म्हणालेत. आमदार रोहित पवार पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत.

Manoj Jarange Patil Warn To  Government:
आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

जरांगे पाटील कोल्हापूरला जाता जाता रोहित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीपूर्वी जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवरून भाष्य केलं. सरकारने कर्जमाफी नव्हे तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी मागणी देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केली.

ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची त्यांच्या सेवेतील अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून २५ वी बदली झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. राजकारणी आणि व्हीआयपी लॉबीला न जुमानता त्यांनी बेधडक कारवाई करत भेसळखोरांचे कंबरडे मोडत आहेत. त्याच दरम्यान मुंढे यांच्या बदलीची चर्चा होत आहे, त्यावरून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला उघड इशारा दिला.

तुकाराम मुंढे हे खूप चांगलं काम करत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यामुळे थेट सामान्य जनतेच्या आरोग्याला फायदा होणार आहे. तसेच दुधातील भेसळ थांबल्याने शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला चांगला भाव मिळेल. त्यामुळे सरकारनं मुंढे यांच्या बदलीच्या भानगडीत अजिबात पडू नये, अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागू, असं जरांगे म्हणाले.

कायमची कर्जमुक्ती झाली पाहिजे - जरांगे पाटील

शेतकऱ्यांची कर्जमाफी बोलताना जरा्ंगे पाटील म्हणाले,सरकारने आता दिलेल्या शेतकरी कर्जमाफी वर कुठलाच शेतकरी समाधानी नाहीये. फक्त कर्जमाफी नको तर कायमची कर्जमुक्ती झाली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. तुम्ही एकदा कर्जमुक्ती करा आणि शेतीमालाला भाव द्या तुला शेतकरी कधी कर्ज काढणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com