Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Manasvi Choudhary

‘ॐ नमः शिवाय’

हिंदू आध्यात्मिक परंपरेमध्ये ‘ॐ नमः शिवाय’ हा भगवान शिवाचा अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र पंचक्षरी मंत्र मानला जातो. अनेक भक्त नियमितपणे या मंत्राचा जप करतात.

Om Namah Shivaya Mantra Benefits

१०८ वेळा 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप का करतात?

हिंदू धर्म आणि अध्यात्मामध्ये १०८ या संख्येला विशेष स्थान दिले आहे. रोज नियमितपणे १०८ वेळा 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप केल्याने केवळ आत्मिक शांतीच मिळत नाही, तर शरीरात आणि मनामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात.

Om Namah Shivaya Mantra Benefits

‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप अर्थ

‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा अर्थ "मी भगवान शिवाला वंदन करतो" किंवा "मी माझ्या अंतरात्म्याचा सन्मान करतो" असा होतो. या मंत्राच्या उच्चारणाने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

Om Namah Shivaya Mantra Benefits | Canva

मानसिक ताण आणि चिंता दूर होते

‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राच्या उच्चारणातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे मनाला शांतता मिळते. रोज १०८ वेळा जप केल्याने मनातील अनावश्यक विचार कमी होतात आणि नैराश्य किंवा ताणतणाव दूर होण्यास मदत होते.

Reduces Stress & Anxiety | yandex

एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते

१०८ वेळा जप करताना मनाची एकाग्रता एकाच बिंदूवर केंद्रित करावी लागते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि कामात किंवा अभ्यासात मन लागते.

Improves Focus & Concentration

सकारात्मक ऊर्जा

हा मंत्र उच्चारल्यामुळे शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे वलय तयार होते. यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि दिवसभर शरीर व मन फ्रेश राहते.

Boosts Positive Energy | GOOGLE

सकारात्मक आत्मविश्वास वाढतो

नियमित जप केल्यामुळे मनाची भीती आणि अनामिक धाकधूक नाहीशी होते. व्यक्तीमध्ये मानसिक स्थैर्य येते आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याचा आत्मविश्वास बळावतो.

Boosts Positive Energy

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Bank Account Money After Death
येथे क्लिक करा...