Pune Zika Virus Update  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Zika Virus Update: पुण्यात झिका व्हायरसमुळे टेन्शन वाढलं, २० जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले

Zika Virus Patient Found in Pune: पुण्यात आढळलेल्या झिका व्हायरच्या ३ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये झिका व्हायरसने (Zika Virus) टेन्शन वाढवले आहे. पुण्यामध्ये झिकाचे आतापर्यंत ३ रुग्ण आढळले आहेत. झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे आरोग्य आरोग्य विभागाकडून (Pune Health Department) विशेष लक्ष ठेवले जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. झिकाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगर पालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये आढळलेल्या झिकाच्या ३ रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या २० जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हे ३ रुग्ण ज्या परिसरामध्ये आढळले होते त्या एरंडवणा आणि मुंढवा परिसरातील २ हजार ४२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या परिसरामधील नागरिकांना झिका व्हायरसची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे.

पुण्यामध्ये झिका व्हायरसने शिरकाव केला आहे. पुण्यामध्ये बुधवारी एरंडवणा परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. तर झिकाची लागण झालेला तिसरा रुग्ण कोंढवा परिसरामध्ये आढळला होता. या तिन्ही रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णांना ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली होती. सध्या तिघांची देखील प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुण्यामध्ये झिकाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आता इतर महानगर पालिका देखील सतर्क झाल्या आहेत. नाशिक महानगर पालिकेने घरोघरी जाऊन तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. खासगी रुग्णालयांना देखील रुग्णांची माहिती कळवण्याचं बंधन केले आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात झिकाचा रुग्ण उपचार घेत असतानाही संबंधित पालिकेला माहिती न कळवण्याचा प्रकार लक्षात घेता महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांवर नजर ठेवण्याचा नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने निर्णय घेतला आहे. संशयित झिकाच्या रुग्णांची खासगी रुग्णालयाकडून माहिती मागवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT