Pune Lok Sabha Constituency: पुण्यामध्ये कोण मारणार बाजी? भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेसचा पंजा ठरणार भारी?

Maharashtra's Pune Election 2024 Result Battle Between Muralidhar Mohol VS Ravindra Dhangekar VS Vasant More: पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झाली. महत्वाची लढत भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये झाली. या निवडणुकीत कोण विजयी होईल हे चित्र येत्या ४ तारखेला स्पष्ट होईल.
Pune Lok Sabha Election 2024: पुण्यामध्ये कोण मारणार बाजी? भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेसचा पंजा ठरणार भारी?
Muralidhar Mohol VS Ravindra Dhangekar VS Vasant MoreSaam TV

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election 2024) सर्वात जास्त चर्चेचा ठरलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे पुणे. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये (Pune Lok Sabha Constituency) यावेळी तिहेरी लढत पाहायला मिळाली. भाजपसह काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आणि दोन्ही पक्षांनी प्रचारही तितक्याच ताकदीने केला. या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये तगडी फाइट झाली. भाजपचे मुरलीधर मोहळ, काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली.

या मतदारसंघामध्ये पुण्याचे महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहळ यांना भाजपकडून संधी देण्यात आली. तर काँग्रेसकडून कसाब्याचे विद्यमान आमदार असलेल्या रविंद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली. तर नाराजी नाट्यानंतर मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरे हे ही निवडणूक लढण्यावर ठाम राहिले आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळाले. या निवडणुकित प्रचारादरम्यान तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. त्याचसोबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील केले. या मतदारसंघामध्ये पुणेकरांची पसंती नेमकी कोण असणार आहे आणि त्यांनी कोणाला जास्त मतदान केलं हे चित्र येत्या ४ जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Pune Lok Sabha Election 2024: पुण्यामध्ये कोण मारणार बाजी? भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेसचा पंजा ठरणार भारी?
Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली होती. तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा झाली होती. भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. तर काँग्रेसही मागे न हटता त्यांनी देखील जबरदस्त प्रचार केला. वसंत मोरे यांनी देखील पुण्यात जोरदार सभा घेत प्रचार केला. पुणे मतदारसंघामध्ये यावेळी ५३.५४ टक्के मतदान झाले. या मतदारसंघामध्ये खरी लढत भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्यामध्ये झाली. आता यामधील कोणी बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Pune Lok Sabha Election 2024: पुण्यामध्ये कोण मारणार बाजी? भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेसचा पंजा ठरणार भारी?
Kolhapur Lok Sabha : छत्रपतींच्या गादीचा करिष्मा? कोल्हापुरच्या लढतीत संजय मंडलिकांची खासदारकी वाचणार का?

पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे अनिल शिरोळे विजयी झाले होते. त्यांना ५,६९,८२५ मतं मिळाली होती. त्यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता. विश्वजीत कदम यांना २,५४,०५६ मतं मिळाली होती. तर २०१९ च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांचा ६३२,८३५ इतक्या मतांनी विजय झाला होता. त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव केला होता. मोहन जोशी यांना ३,०८,२०७ मतं मिळाली होती.

Pune Lok Sabha Election 2024: पुण्यामध्ये कोण मारणार बाजी? भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेसचा पंजा ठरणार भारी?
Sangli Lok Sabha : कोण होणार सांगलीचा 'पाटील'? बंडखोरी पथ्यावर पडणार की महाराष्ट्र केशरी 'काकां'चा डाव पालटणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com