Kolhapur Lok Sabha Election: छत्रपतींच्या गादीचा करिष्मा? कोल्हापुरच्या लढतीत संजय मंडलिकांची खासदारकी वाचणार का?

Maharashtra Election 2024 Result: Shahu Maharaj Chhatrapati VS Sanjay Mandlik | कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात चुरसीची निवडणूक होत आहे. यावेळी या मतदारसंघात मतदानाचा टक्काही वाढला आहे.
Kolhapur Lok Sabha Election 2024 Result: छत्रपतींच्या गादीचा करिष्मा? कोल्हापुरच्या लढतीत संजय मंडलिकांची खासदारकी वाचणार का?
Shahu Maharaj Chhatrapati VS Sanjay Mandlik Election 2024 BattleSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीत देशात महाष्ट्रातील लोकसभा निवडणूक तशी विशेष आहे, कारण पक्षफूटीचं राजकारण. याच्याच राजकारणावरून राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती आणि प्रचारातही हा मुद्दा गाजला. महाराष्ट्रातील गाजलेल्या मतदारसंघापैकी एक कोल्हापूर मतदारसंघ. सत्ताधारी विरूद्ध महाविकास आघाडी अशीही लढत होती. मात्र एक्झिट पोलमधून मांडलेल्या अंदाजांमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज जिंकण्याचा अंदाज आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघात संजय मंडलिक आणि धैर्यशिल माने विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक, त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवू शकतो. मात्र महाविकास आघाडीने संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू महाराज यांना रिंगणात उतरवल्यामुळे या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. कोल्हापुरात यावेळी मतदानाचा टक्का वाढला असून 63.71 टक्के मतदान झालं आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता आहे.

कोण आहेत शाहू महाराज छत्रपती?

शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत. स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाल्यानंतर कोल्हापुरात करवीर अधिपती अशी ओळख आहे. शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आत्ताच्या शाहू महाराज छत्रपती यांना नागपूरकर भोसले या यांच्याकडून दत्तक घेतलं होतं. शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूपच गाजलं होतं.

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result: छत्रपतींच्या गादीचा करिष्मा? कोल्हापुरच्या लढतीत संजय मंडलिकांची खासदारकी वाचणार का?
Beed Lok Sabha Election: बीडमध्ये जातीय राजकारणाचा फटका बसणार? काय असणार पंकजा मुंडेंचं भवितव्य

कोण आहेत संजय मंडलिक?

संजय मंडलिक कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव. सदाशिवराव मंडलिक आधी राष्ट्रवादीत होते. मात्र नंतर राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांनी खासदारकीची निवडूक अपक्ष लढवली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत ते निवडून आले होते. सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ ची निवडणूक लढवली. २०१९ च्या निवडणुकीत संजय मांडलिकविरुद्ध खासदार धनंजय महाडिक अशी लढत झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा दारुण पराभव करत खासदार झाले होते.

2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती आणि या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना होता. राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार धनंजय महाडिक शिवसेनेच्या संजय मांडलिकांविरोधात उभे होते. यावेळी केवळ 33, 542 मतांनी राष्ट्रवादीच्या महाडिकांनी शिवसेनेच्या मंडलिकांचा पराभव केला. मात्र 2019 च्या निवडणुकीत मंडलिकांनी त्याचा वचपा काढला. मंडलिकांनी तब्बल 2,70,568 मतांनी महाडिकांना अस्मान दाखवलं. २०१४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस तर २०२९ मध्ये शिवसेनेला मतदारांचा कौल मिळाला. त्यामुळे कोल्हापुरात दोन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. विशेष म्हणजे 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जवळपास 50 मतदान मिळालं आहे. मात्र यावेळी समीकरणं काही वेगळीचं आहेत. कारण शिवसेना असो की राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. मात्र छत्रपतींची गादी कोल्हापुरात कॉंग्रेसला तारण्याची शक्यता आहे.

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result: छत्रपतींच्या गादीचा करिष्मा? कोल्हापुरच्या लढतीत संजय मंडलिकांची खासदारकी वाचणार का?
North East Mumbai Constituency: ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा की संजय दिना पाटील? मतदार कोणाच्या गळ्यात घालणार खासदारकीची माळ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com