Beed Lok Sabha Election: बीडमध्ये जातीय राजकारणाचा फटका बसणार? काय असणार पंकजा मुंडेंचं भवितव्य

Maharashtra's Beed Election Result Battle: Pankaja Munde VS Bajrang Sonawane: बीड लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत आहे. भाजप पुन्हा बीडचा मतदारसंघ राखणार का? का बजरंग सोनवणे विजयी होणार? ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Beed Lok Sabha Election 2024: बीडमध्ये जातीय राजकारणाचा फटका बसणार? काय असणार पंकजा मुंडेंचं भवितव्य
Beed Loksabha Election Candidate Pankaja Munde (BJP) VS Bajrang Sonawane (Sharad Pawar Group) Saam TV

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ. बीडच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मराठा आरक्षण आंदोलन, मराठाविरुद्ध ओबीसी, मराठा- वंजारी वाद, अशा विविध मुद्यांमुळे बीडने अख्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या ह्या निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय.

अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आल्याने पंकजा मुंडेंना त्यांचे चुलत बंधु धनंजय मुंडे याचा पाठिंबा मिळाला,शिवाय त्यांनी जीव तोडून पंकजा ताईंसाठी प्रचारदेखील केला. बीड लोकसभेसाठी यावेळी तब्बल ४१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये मात्र महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात खरी लढत झाली.

भाजपने पंकजा मुंडेंची नाराजी दूर करत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली.पण त्यासाठी प्रीतम मुंडेंचं मात्र तिकीट कापण्यात आलं. यासंदर्भातील पंकजा यांनी त्यांची नाराजीही वेळोवेळी बोलून दाखवली होती. पक्षचा आदेश मानत लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. लोकसभा २०२४ ची निवडणूक ही पंकजा मुंडेंसाठी खूप महत्त्वाची आहे. विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना आपलं राजकीय वजन वाढवण्यासाठी खूप खटाटोप करावा लागल्याचं दिसलं होतं. त्याचेवळी यंदा त्यांच्या खांद्यावर लोकसभा निवडणूक जिंकून आणून देण्याचं आव्हान आहे. कारण यावेळीही प्रीतम मुंडेंना टक्कर देणारे बजरंग सोनवणे हेच यंदाही निवडणुकीच्या रिंगणात पंकजा मुंडेंच्या विरोधात उभे आहेत.

कोणाचं आहे आव्हान

पंकजा मुंडे यांना चुलत भावाशी संघर्ष करावा लागला नसला तरी त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विरोधात लढावे लागले. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले मराठा नेते बजरंग सोनवणे यांच्याशी पंकजा मुंडे यांना दोन हात करावे लागले आहे. बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा परिषदेचे उपसभापती आहेत.दरम्यान मागील लोकसभेत प्रीतम मुंडेंविरोधात पराभूत होणारे बजरंग सोनवणे यांना त्यांचा विजय होईल असा विश्वास आहे.

माझा विरोधक कडवी टक्कर देण्याच्या स्थितीत नाही कारण ती बीडमध्ये उपलब्ध नसल्याची टीका सोनवणे यांनी केली होती. साखर कारखान्यावरुनही सोनवणे यांनी मुंडेंवर टीका केली होती. “मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना दिवाळखोरीत निघाला.ऊस उत्पादक,वाहतूकदार आणि ऊस तोडणाऱ्यांना पैसे दिले नसल्याची टीकाही त्यांनी केली होती. दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा प्रचार केला होता.

यंदा २०२४ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती. २०१९मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभा झाल्या होत्या. यंदा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, आणि धनंजय मुंडे यांनी प्रचार सभा घेतल्या. धनंजय मुंडेंनी घेतलेल्या सभेत बजरंग सोनवणे यांना चंदनाच्या मुद्द्यावरुन घेरलं होतं.तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करा, असं आव्हानही त्यांनी शरद पवारांना दिलं होतं.

मराठा आराक्षण - जातीय ध्रुवीकरण चर्चेत

या निवडणुकीच्या निकालावरुनचं राजकीय अस्तित्व काय असेल हे समजणार आहे. पंकजा मुंडे यांच्याविरुद्धात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे कडवे आव्हान आहे. मात्र शनिवारी टीव्ही९ च्या पोलस्ट्रॉटच्या एक्झिट पोलनुसार,पंकजा मुंडे ह्या विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या जातीय धु्व्रीकरणाचा फटका मुंडेंना बसेल, असं वाटत होतं.

पण हा वाद पंकजा मुंडेंच्या पथ्यावर पडताना दिसतोय. बीडच्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीत जातीचा मुद्दा चर्चेत राहिला. अगदी गावाच्या चौकापासून ते देशाच्या नेत्यापर्यंतच्या सभांमध्ये जातीचा मुद्दा तापला होता. तसेच यावेळी मतदानाचा टक्काही पावणे चारने वाढला होता.या सर्व टक्केवारीचा अंदाज आणि जातीय समीकरणे जुळवून कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जातायत.

दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापलेला पाहायला मिळाला होता.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही मोठा प्रभाव या मतदारसंघात होता. मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय संघर्षही या मतदारसंघात वाढल्याने निकालात काही फरक पडणार हे पाहावं लागेल. मनोज जरांगे यांचे मराठा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये नेहमी मराठा विरुद्ध वंजारा असं समीकरण राहिले आहे.पंकजा मुंडे ह्या ओबीसी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलानामुळे त्यांना जागोजागी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागलं होतं. अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा ताफा अडवण्यात आला होता. दरम्यान पंकजा मुंडे यांनी बीडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काम केलं होतं. मात्र मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंडे यांचे स्थानिकांशी असलेले संबंधात तेढ निर्माण झालीय.

काय राहिली मतदानाची टक्केवारी

बीड लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का दर निवडणुकीला वाढताना दिसत आहे.मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा बीडमध्ये मतदानाचा टक्का वाढलाय. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान झालं. यात ७०.९२ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

डॉ.प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा १ लाख ७८ हजार ९२० मतांनी दारुण पराभव केला होता. २०१९ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघात ६६.६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. हा आकडा २०१४ ला झालेल्या मतदानाच्या तुलनेत जास्त होता. २०१९ला २०१४च्या तुलनेत २ टक्क्याने मतदान वाढलं होतं.

Beed Lok Sabha Election 2024: बीडमध्ये जातीय राजकारणाचा फटका बसणार? काय असणार पंकजा मुंडेंचं भवितव्य
Nagpur lok sabha : नितीन गडकरी हॅट्रिक साधणार? की काँग्रेसचे विकास ठाकरे भाजपचा विजयी रथ रोखणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com