Pankaja Munde : बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते; पंकजा मुंडे मतदानाच्या दिवशी भावुक

Pankaja Munde News : 'आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी भावुक झाल्याचे पाहायला मिळालं.
Pankaja Munde Shivshkti Daura
Pankaja Munde Shivshkti DauraSaamtv

बीड : देशासहित राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. या मतदारसंघातील मतदार सकाळी ७ वाजल्यापासून मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. आज सोमवारी बीडमध्येही मतदान सुरु आहे. या लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे रिंगणात आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. 'आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी भावुक झाल्याचे पाहायला मिळालं.

बीड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारसंघासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असतानाही नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसत आहे. आजच्या मतदानाच्या आधी पंकजा मुंडे असल्याच्या दिसून आल्या. 'आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते. माझ्या पत्रिकेतच संघर्ष लिहिलाय. त्यामुळे राजकारणात सहज मिळालं तर नेता होता येत नाही. त्यामुळे कठीण प्रसंगातून जावं लागतं, असे मुंडे म्हणाल्या.

'मुंडे साहेब शरीराने नसले तरी साहेबांची उर्जा माझ्यात आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, अशा त्या पुढे म्हणाल्या.

Pankaja Munde Shivshkti Daura
Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवाशांसाठी खूशखबर; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी MSRDCने घेतला मोठा निर्णय

'शरद पवार हे नेहमी जिल्ह्यात निवडणुकीत येत असतात. ते त्यांच्या उमेदवारीसाठी इथं आले होते. या निवडणुकीत काही प्रश्न असे असतात की, ते अर्ध्या निवडणुकीते वाटोळं करून टाकतात. त्यामुळे माझं जनतेला आवाहन आहे की, मतदानाता टक्का वाढवावा, असेही आवाहन मुंडे यांनी केलं.

Pankaja Munde Shivshkti Daura
Pune Bogas Voting : माझ्या नावावर कुणीतरी बोगस मतदान केलं; पुण्यातील तरुणी भडकली, VIDEO केला शेअर

पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब केलं मतदान

बीडमधील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे , राजर्षी धनंजय मुंडे कुटुंबाने नाथरा या गावात मतदान केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com