महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर राज्यातील पहिली इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) बसवली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक नेहमीच ट्राफिक जाम असते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आठवडाभर आणि आठवड्याच्या शेवटी सरासरी ४० हजार ते ६० हजार वाहनांच्या रांगाच रांगा असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आता एआयचा वापर करण्यात येणार आहे. इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यासाठी एक्सप्रेस वेच्या ९५ किमी अंतरापर्यंत ३९ ग्रँटी बसवण्यात आल्या आहे. यामुळे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. यासाठी २१८ आर्टिफिशियल इंजेलिजेंस कॅमेरा बसवण्यात आले आहेत. यामुळे १७ प्रकारचे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारवाई करणे सोपे होणार आहे. हे सर्व कॅमेरे आणि टोल बूथवरील कॅमेरे वाहनांच्या ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळखण्यासाठी सुसज्ज असतील. यामुळे पोलिसांना वाहनांच्या नंबर प्लेटच्या साहाय्याने ई-चलान जारी करण्यास शक्य होईल.
एक्सप्रेस वेवरील सर्व एंट्रीमध्ये माल वाहकांसाठी वेट-इन मोशन मशीन असेल. ११ ठिकाणी हवामान निरिक्षण यंत्रणा बसवण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एक्सप्रेस वेवर टो व्हॅन, क्रेन, अॅम्ब्युलन्ससह ३६ आपत्कालीन वाहने ट्रॅकिंग सिस्टीमसह सुसज्ज असतील. तर ११ ठिकाणी संदेश देणारे फलक असतील. तसेच वाहनचालकांना वाहतूकीची माहिती, रस्ते बंद होण्याबद्दल अपडेट अशी सर्व माहिती दिली जाईल. आत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्ते व्यवस्थापन आणि वाहनचालकांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात सुधारेल, असे हायवे ट्राफिक पोलिस पनवेलचे अधीक्षक तानाजी चिकले यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.