Pune Lok Sabha: पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा; बुथवर कॉंग्रेसचे बॅनर, भाजप कार्यकर्ते आक्रमक

BJP Protest Against Congress Banner: पुण्यात आज मतदानाच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. बुथवर कॉंग्रेसचे बॅनर लागल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पुण्यात आज मतदान
Pune Lok SabhaSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुण्यात आज मतदानाच्या (Pune Lok Sabha) दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. बुथवर कॉंग्रेसचे बॅनर लागल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुण्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. बुथवर कॉंग्रेसचे बॅनर लागल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यातील फडके हौद चौक परिसरात आंदोलन केलं आहे.

बुथवरील कॉंग्रेसचे बॅनर काढण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. पुण्यात राजकीय गोंधळ थांबत नसल्याचं चित्र आहे. मतदान केंद्राबाहेर काँग्रेस उमेदवाराचे फ्लेक्स लावून स्लीप वाटप करण्यात येत (Muralidhar Mohol Against Ravindra Dhangekar) आहे. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी करत भाजप नेते हेमंत रासने यांनी आज आंदोलन केलं आहे.

बुथवरील कॉंग्रेसच्या या बॅनरबाजीमुळे भाजप कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनानंतर प्रशासनाने फ्लेक्स फाडून काढला. रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी, गुन्हा दाखल करावा (Pune News) अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. प्रशासनाने योग्य कारवाई केल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे. पुण्यात आज मतदानाच्या दिवशीच वातावरण तापलेलं आहे.

पुण्यात आज मतदान
Pune Lok Sabha Voting: पैसे देऊन मतं विकत घेतली? रोहित पवारांनी शेअर केलेल्या आणखी Video ने खळबळ, काटेवाडीत काय घडलं?

दरम्यान काल महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केलं होतं. त्यांनी भाजप कार्यकर्ते मतदारांना पैशांचं आमिष देत असल्याचा आरोप केला होता. घराघरात जाऊन पैसे दिले जात (BJP Protest Against Congress Banner) आहेत. परंतु पोलीस काहीही कारवाई करत नसल्याचं म्हणत त्यांनी सहकारनगर पोलीस चौकीत ठिय्या मांडला होता. पोलीस कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन चालुच ठेवू असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

पुण्यात आज मतदान
Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com