Lok Sabha Election 2024 : ईव्हीएमचा खोळंबा थांबता थांबेना; राज्यात अनेक ठिकाणी बिघाड, मतदारांचा हिरमोड

Lok Sabha Election 2024 update : राज्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे, शिरुर, जालना या जिल्ह्याील काही मतदान केंद्रावर मशीन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदारांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळालं.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Saam tv

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशासहित राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. काही ठिकाणी मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे, शिरुर, जालना या जिल्ह्याील काही मतदान केंद्रावर मशीन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदारांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळालं.

देशासहित राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु झालं आहे. राज्यातील ११ मतदारसंघातील मतदार सकाळी ७ वाजल्यापासून मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. ईव्हीएम मशीनच्या आधारे सुरु असलेल्या असलेलं काही वेळासाठी बंद पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

Lok Sabha Election 2024
Jalgaon Lok Sabha Election : गिरडला २५ मिनिट बॅलेट मशीन बंद; जळगाव जिल्ह्यात सकाळी मतदान संथगतीने

अंबडमध्ये मशीनमध्ये बिघाड

जालन्यातील अंबड तालुक्यातील आलमगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालं. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांनी मशीन दुरुस्त करण्यात आलं. त्यानंतर या केंद्रावर शांततेत मतदान सुरु झालं.

Lok Sabha Election 2024
Baramati News: मोठी बातमी! बारामतीत EVM मशीन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही बंद; आमदार रोहित पवार संतापले

भोकरदनमध्ये व्हीव्हीपॅट मशीन बंद

जालन्यातील भोकरदन शहरातील मतदान केंद्र क्रमांक 188 येथे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडली. त्यामुळे या केंद्रातील मतदान प्रक्रिया थांबलेली आहे.

जालन्यात तीन ठिकाणी मशीन बंद

जालन्यात मतदान सुरू झाल्यापासून तीन ठिकाणी मशीन बंद पडण्याचा प्रकार घडला आहे. पैठण येथील एका मतदान केंद्रावर पूर्ण संच बदलण्याची वेळ आली. तर अंबड तालुक्यातील अमलगाव, भोकरदन शहरातील एका मतदान केंद्रावर बंद मशीन पडली होती. दुरुस्तीनंतर मतदान प्रकिया सुरळीत झाली.

Lok Sabha Election 2024
Arvind Kejriwal's Bail News: अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन; लोकसभा निवडणूक प्रचार करणार, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर ४ वेळा ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील पंचायत समिती मतदान केंद्र क्रमांक 56 वर आतापर्यंत चार वेळा ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी भेट दिली. या घटनेमुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त केला. यामुळे पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल झाला आहे.

शिरूरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

शिरूरमधील काही जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्यामुळे मतदार तासभरापासून रांगेत उभे आहेत. अशा परिस्थितीत मतदान केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मतदारांनी घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com