Jalgaon Lok Sabha Election : गिरडला २५ मिनिट बॅलेट मशीन बंद; जळगाव जिल्ह्यात सकाळी मतदान संथगतीने

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदार संघात सकाळच्या सत्रात मतदान शांततेत पार पडत असून संथ गतीने मतदान होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha ElectionSaam tv


जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) जळगाव व रावेर मतदार संघात सकाळच्या सत्रात मतदान शांततेत पार पडत असून संथ गतीने मतदान होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान (Lok Sabha Election) जळगाव लोकसभा मतदार संघातील गिरड (ता. भडगाव) येथील बुथवर बॅलेट मशीन बंद पडल्याने २५ मिनिट मतदान प्रक्रिया थांबली होती. 

Jalgaon Lok Sabha Election
Maharashtra Politics: नाशिकमध्ये पैशांचा पाऊस, संजय राऊत यांचा आरोप, VIDEO केला पोस्ट

लोकसभेच्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर (raver) या दोन्ही लोकसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळपासून संथ गतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी काही मतदान केंद्रांवर रांगा दिसत होता. मात्र टक्केवारी मात्र कमी असल्याचे दिसून येत आहे. यात जळगाव लोकसभा क्षेत्रात ६.१४ टक्के तर रावेर लोकसभेत ७. १४ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान मतदान मोठ्या संख्येने होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Accident : कारची दुचाकीला धडक; गर्भवती महिलेचा मृत्यू, पतीसह चार वर्षीय बालिका जखमी

बॅलेट मशीन बंद पडल्याने गोंधळ 

जळगाव लोकसभा मतदार संघातील गिरड (ता. भडगाव) येथे २८२ बुथवर बॅलेट मशीन बंद पडले होते. जवळपास २५ मिनिटे मशीन बंद झाल्याने काहींशी तारांबळ उडाली होती. यामुळे मतदान देखील थांबले होते. परिणामी मतदार देखील ताटकडत बसले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन मशीन चालू करण्यात आल्यानंतर मतदानाला सुरवात झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com