Maharashtra Politics: नाशिकमध्ये पैशांचा पाऊस, संजय राऊत यांचा आरोप, VIDEO केला पोस्ट

Sanjay Raut on CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दोन तासांसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते, मग पोलीस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
Sanjay Raut on CM Eknath Shinde
Sanjay Raut on CM Eknath ShindeSaam TV

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटले जात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दोन तासांसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते, मग पोलीस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

Sanjay Raut on CM Eknath Shinde
Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये सुजय विखे अन् निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडले; रस्त्यावर पडलेली ती पैशांची बॅग कुणाची? VIDEO व्हायरल

या बॅगांमधून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदीआ णि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्वीटर) संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे जेव्हा नाशिक येथे हेलिकॉप्टरने पोहचले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तसेच पोलिसांच्या हातात मोठमोठ्या बॅग होत्या. यावरून संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस... दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत? यातून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. रविवारी रात्री १० वाजता मनोहर गार्डन हॉटेलमध्ये शिंदेंनी युतीतील नाराज असलेल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हॉटेलच्या रूममध्ये वन टू वन चर्चा करून स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. यावेळी उदय सामंत देखील त्यांच्यासोबत होते.

Sanjay Raut on CM Eknath Shinde
Breaking News: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये खोळंबा; छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार ताटकळले, प्रशासनाची धावपळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com