Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये सुजय विखे अन् निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडले; रस्त्यावर पडलेली ती पैशांची बॅग कुणाची? VIDEO व्हायरल

Rahul Shinde VS Nilesh Lanke: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. मध्यरात्री पारनेरचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
Ahmednagar Lok SabhaSaam Tv

सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha) आज मतदान पार पडत आहे. मध्यरात्री पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि निलेश लंके यांचे कार्यकर्ते मध्यरात्री एकमेकांना भिडले. या दोन गटांमध्ये मतदारांना पैसे वाटपावरून वाद झाल्याची माहिती मिळते.

मध्यरात्री भर रस्त्यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली आहे. पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. संबंधित पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा आरोप निलेश लंकेंच्या (Rahul Shinde VS Nilesh Lanke) कार्यकर्त्यांनी केला आहे. तर काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप राहुल शिंदे यांनी केला आहे. तर व्हिडिओमध्ये दिसतंय की, पैशाने भरलेली एक बॅग रस्त्यावर पडलेली आहे. रस्त्यावर पडलेली ती पैशांची बॅग कुणाची असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील ही घटना आहे. याप्रकरणी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि विजय औटी यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यामुळे अहमदनगरच्या (Lok Sabha Election 2024) वडझिरे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. तर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळालं आहे. अहमदनगरमध्ये सुजय विखे अन् नीलेश लंकेंच्या कार्यकर्ते भिडल्याची घटना पाहायला मिळाली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
Lok Sabha Election : ऐन निवडणुकीत मतदान ओळखपत्र आढळली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात; जालना शहरातील घटनेने खळबळ

राज्यात आज चौथ्या टप्प्यात ११ जागांसाठी मतदान (Maharashtra Election) होत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप उमेदवार सुजय विखे तर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदावर निलेश लंके अशी लढत होत आहे. दरम्यान मध्यरात्री निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे. आज राज्यात ११ मतदारंसघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
Lok Sabha 2024: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com