Arvind Kejriwal's Bail News: अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन; लोकसभा निवडणूक प्रचार करणार, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Arvind Kejriwal's Latest News in Marathi: अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं १ जूनपर्यंत त्यांंना जामीन मंजूर केला आहे.
Arvind Kejriwal Gets Interim Bail Till 1st June In Liquor Policy Case As Per Supreme Court
Arvind Kejriwal Gets Interim Bail Till 1st June In Liquor Policy Case As Per Supreme CourtANI

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्या. संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं शुक्रवारी हा निर्णय दिला.

Arvind Kejriwal Gets Interim Bail Till 1st June In Liquor Policy Case As Per Supreme Court
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीत मतदान होणार आहे. त्याआधीच अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानं हा आम आदमी पक्षासाठी सर्वात मोठा दिलासा आहे, असं मानलं जात आहे.

अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन देण्याबाबतची विनंती सुप्रीम कोर्टात केली होती. त्यावर न्या. संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दिल्लीतील मद्यधोरण प्रकरणात झालेल्या अटकेला आव्हान देतानाच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता यावं यासाठी अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी विनंती केजरीवाल यांनी या याचिकेद्वारे केली होती.

कोर्टानं काय सांगितलं?

अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं तब्बल ५१ दिवसांनी ते तुरुंगाबाहेर येतील. कोर्टानं सांगितलं की, अरविंद केजरीवाल यांना २० दिवसांसाठी अंतरिम जामीन देत आहोत. २ जूनपर्यंत प्रचारावर कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. केजरीवाल यांच्यावर काही बंधनं टाकण्यात याव्यात असं ईडीनं म्हटलं होतं. पण कोर्टानं कोणतीच बंधनं ठेवली नाहीत, अशी माहिती वकिलांनी दिली.

Arvind Kejriwal Gets Interim Bail Till 1st June In Liquor Policy Case As Per Supreme Court
Loksabha Election: उमेदवारांना अधिक किंमतीच्या मालमत्तेची माहिती द्यावीच लागेल : सुप्रीम कोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com