Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

Arvind Kejriwal latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी खलिस्तानी फंडिंग प्रकरणी एनआयएने तपास करावा, अशी मागणी केली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam Tv

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी खलिस्तानी फंडिंग प्रकरणी एनआयएने तपास करावा, अशी मागणी केली आहे. केजरीवाल सध्या कथित मद्य विक्री धोरण विक्री प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. मंगळवारी सुप्रीम कोर्टात त्यांच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी खलिस्तानी फंडिंग प्रकरणी 'एनआयए'द्वारे चौकशीची मागणी केली आहे. नायब राज्यपाल व्ही.के सक्सेना यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहित चौकशीची मागणी केली आहे. बंदी घातलेल्या 'शीख फॉर जस्टिस' या दहशतवादी संघटनेकडून अरविंद केजरीवाल यांनी राजकीय निधी घेतल्याचा पत्रात उल्लेख आहे, असा नायब राज्यपाल यांचा आरोप आहे.

Arvind Kejriwal
JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

नायब राज्यपाल व्ही.के सक्सेना यांना जागतिक हिंदू महासंघाकडून एक तक्रार मिळाली होती, त्या आधारे मागणी केली. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने खलिस्तानी दहशतवादी गटाकडून १६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १३३ कोटी रुपये घेतल्याचा तक्रारीत उल्लेख असल्याचा नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांचा आरोप आहे.

Arvind Kejriwal
Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

नायब राज्यपालांच्या पत्रावर आपची जहरी टीका

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या पत्रावर आम आदमी पक्षाने जहरी टीका केली आहे. 'नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना हे भाजपचे एजंट आहे. भाजच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात हे आणखी मोठे षडयंत्र रचलं आहे, अशा शब्दात दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी टीका केली.

'दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागा या भाजप हरणार असल्याने नाराज आहे. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाने हा कट रचला होता, असा आरोप मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला. आम आदमी पक्षाने भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com