Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Amit Shah On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी आधी अमेठी, नंतर वायनाड आणि आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीमध्ये राहुल गांधींचा मोठ्या फरकाने पराभव होणार, असं भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
Amit Shah On Rahul Gandhi
Amit Shah On Rahul GandhiSaam Tv

Lok Sabha Election 2024:

काँग्रेस नेते राहुल गांधी आधी अमेठी, नंतर वायनाड आणि आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीमध्ये राहुल गांधींचा मोठ्या फरकाने पराभव होणार, असं भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. गुजरातमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी आणो काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

अमित शाह यांनी राहुल गांधींच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टीका करत इंडिया आघाडीवर दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोपही केला. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील ओबीसींचा कोटा मुस्लिमांना पुन्हा वाटप केल्याचा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला.

Amit Shah On Rahul Gandhi
Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले आहेत की, ''2024 च्या निवडणुकीसाठी देशातील जनतेकडे दोन पर्याय आहेत. एकीकडे चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले राहुल गांधी आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत, ज्यांचा जन्म एका गरीब चहा विक्रेत्याच्या कुटुंबात झाला. एकीकडे उन्हाळ्यात बँकॉक आणि थायलंडला जाणारे राहुल आहेत. दुसरीकडे 23 वर्षे एकही रजा न घेता देशाची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. एकीकडे मुस्लिमांना धर्माच्या आधारे एससी-एसटी-ओबीसी आरक्षण देणारी काँग्रेस आहे. दुसरीकडे, भाजपच एससी-एसटी-ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करत आहे.''

ते म्हणाले, ''देशातील जनतेने मोदींना 400 जागा देण्याचे आधीच ठरवले आहे. कमळ चिन्हाशेजारी असलेले बटण दाबल्याने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. याचा अर्थ देशातून दहशतवाद आणि नक्षलवादाला संपूर्ण संपवणं. याचा अर्थ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे आहे.

Amit Shah On Rahul Gandhi
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

अमित शाह पुढे म्हणाले, ''राहुल गांधी याआधी अमेठीतून निवडणूक लढवत होते. पण स्मृतीजींविरुद्ध त्यांचा पराभव झाला. ते वायनाडला गेले आणि तेथे पराभवाच्या भीतीने ते आता रायबरेलीमधून निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीतही तुमचा (राहुल गांधी) पराभव होणार आहे. राहुल यांनासोनियाजींनी 20 पेक्षा जास्त वेळा लॉन्च केले. मात्र ते लॉन्च होऊ शकले नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com