Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान देत मी कोणत्या दबावाला भीक घालणार नाही असे म्हटले आहे.
dhairyasheel mohite patil accepts challenge of devendra fadnavis madha lok sabha election
dhairyasheel mohite patil accepts challenge of devendra fadnavis madha lok sabha electionSaam Digital

Madha Lok Sabha Election :

वेळ पडली तर आतमध्ये जाऊन बसण्याची तयारी असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. यामुळे माढ्यातील निवडणुकीत आव्हान प्रतिआव्हान दिले जात असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघातील माळशिरस येथील सभेत थेट मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधताना आता गुंडगिरी , झुंडशाही , भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला होता. तुमच्या टीकेला कृतीतून उत्तर दिले जाईल असेही फडणवीस यांनी अकलूजच्या विजय चौकात सांगितले होते.

dhairyasheel mohite patil accepts challenge of devendra fadnavis madha lok sabha election
Narayan Rane Vs Uddhav Thackeray: 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, Video

यानंतर मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान देत मी कोणत्या दबावाला भीक घालणार नाही असे म्हटले आहे.

करमाळा तालुक्यातील एका सभेत धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीला भीक घालत नाही. हे केवळ तुमच्यासाठी भीक घालणार नाही. ठरवतानाच मी कुटुंबात माझ्या वडिलांना, आईला आणि पत्नीला, दोन मुलींना सांगितलं होते को इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे.

dhairyasheel mohite patil accepts challenge of devendra fadnavis madha lok sabha election
Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

माझी काहीही तयारी आहे ती फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी सर्व सामान्यांसाठी मी काय पण किंमत मोजेल आत बसण्याची तयारी देखील ठेवली आहे मानसिकता केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

dhairyasheel mohite patil accepts challenge of devendra fadnavis madha lok sabha election
Parbhani Crime News : परभणी हादरलं! शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com