Narayan Rane Vs Uddhav Thackeray: 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, Video
- अमाेल कलये
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election :
'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे आहे, तोंड उघडायला लावू नको. कोकणात आला आहात ना सरळ सरळ जा असं मी आवाहन करताे. आमच्या नेत्यांवर टीका कराल तर कोकणातील सर्व रस्ते बंद करून टाकीन. अडीच वर्ष मुख्यमंत्री, दोन दिवस मंत्रालयात कोकणासाठी काय काम केलं ते सांगावं असा इशारा वजा आवाहन मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना रविवारी दिले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिर्के हायस्कूल मैदानात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेत नारायण राणे बाेलत हाेते. यावेळी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत, मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे नेते प्रकाश महाजन, मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते वैभव खेडेकर, भाजप सहप्रभारी बाळ माने, मनसे सरचिटणीस गजानन राणे, भाजप नेते संदीप कुडतरकर, भाजपाचे राजेश हाटले, रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेबराेबर जिव्हाळ्याचे संबंध
नारायण राणे म्हणाले माझा आणि मनसेचा संबंध अनेक दिवसांपासूनचा आहे आणि जिव्हाळ्याचा आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेला पाचव्या नंबर वर आणले. मी तरुणांना रोजगारात यावे असे आवाहन केलं होतं आणि मी तरुणांसाठी काम करतोय ते राज ठाकरेंना आवडलं होतं त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. यावेळेला मोदींना मत दिलं म्हणजे नारायण राणेंना मत दिले. मी महाराष्ट्राचा साहेब नाही मी महाराष्ट्राचा सेवक आहे असेही राणेंनी म्हटलं.
ठाकरेंच्या सभेला कार्यकर्त्याला पाठविले : राणे
राणे पुढे बाेलताना म्हणाले बाजूला एक सभा होती. मी मुद्दाम कार्यकर्त्याला जायला सांगतिले. त्याला विचारले काय बोलले. पहिलं मोदींवर टीका नंतर उमेदवारावर टीका. आमच्या नेत्यांवर बाेलाल तर मातोश्रीची सर्व हिस्ट्री माझ्याकडे तोंड उघडायला लावू नका. कोकणात आला आहात ना सरळ सरळ जा मी आव्हान करतो.
विनायक राऊत यांनी काही केले नाही
माजी मुख्यमंत्र्यांना अतिवृष्टीमुळे आम्ही कोकणासाठी पैसे मागितले ते दिले नाही. ते काही दिले नाही असे राणेंना उद्धव ठाकरेंवर केली. आत्ताचा खासदार याने दहा वर्षात काही केलं नाही. दोन्ही जिल्ह्यातले गाव सांगावी दहा वर्षात काही कामे केली नाही अशी टीका विनायक राऊत यांच्यावर राणेंनी केली. देश महासत्ताक बनवण्याचे प्रयत्न मोदी करताहेत त्यांना पाठिंबा देऊया असे आवाहन नारायण राणेंनी केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

