Zika virus News : झिका व्हायरसने मृत्यू ओढवू शकतो का? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा!

Zika virus Is Disease Fatal? : झिकाची लागण झाल्यावर त्यातून बरं होण्यासाठी कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे या आजारापासून स्वत:चा बचाव कसा करायचा आणि या आजारातून आपला मृत्यू होऊ शकतो का?
Zika virus Is Disease Fatal?
Zika virus NewsSaam TV

भारतासह महाराष्ट्रात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज पुण्यात झिकाचे नवे दोन रुग्ण आढळून आलेत. झिका रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमधील चिंता देखील वाढली आहे. या आजाराबाबत नागरिकांच्या मनात मोठी भीती आहे. झिकाची लागण झाल्यावर त्यातून बरं होण्यासाठी कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे या आजारापासून स्वत:चा बचाव कसा करायचा आणि या आजारातून आपला मृत्यू होऊ शकतो का? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Zika virus Is Disease Fatal?
#shorts पुण्यात आता झिका व्हायरसचा शिरकाव, पाहा सविस्तर बातमी | Pune | Zika Virus | SAAM TV

झिकामुळे मृत्यू होऊ शकतो का?

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल्स अँड प्रिव्हेन्शन (CDC)च्या अहवालानुसार, झिका व्हायरसची लक्षणे फार सामान्य आहेत. त्यामुळे झिकाची लागण झाल्यावर मृत्यू होत नाही. रुग्णालयात जाऊन व्यवस्थित उपचार घेतल्यास या आजारातून लवकर बरं होता येतं.

गर्भवती महिलांमध्ये संक्रमण जास्त

झिका व्हायरसचा प्रसार जास्तप्रमाणात वाढला आहे. देशभरात गर्भवती महिलांना देखील या आजाराची लागण होताना दिसत आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून गरोदर महालांनी जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ज्या महिलांना बाळ पोटात असताना या आजाराचा सामना करावा लगतो त्यांच्या मुलांना देखील हा आजार होतो. अशा मुलांचा मेंदू जास्त विकसीत होत नाही. बुद्धीचं मोठं नुकसान होतं.

मेंदूचं नुकसान

झिका व्हायरस झाल्यावर तो थेट लहान मुलांच्या मेंदूवर हल्ला करतो. या व्हायरसमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम झाल्याने अशावेळी बाळ पोटातच मृतपावू शकते. झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलेने यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचं आहे.

लक्षणे

झिका व्हायरसमुळे त्या व्यक्तीला

डोकेदुखी

शरीरातील स्नायू जड होणे.

स्नायू दुखूणे.

शरीरावर बारीक पुरळ येणे.

हिरड्या दुखणे.

टीप : हा लेख फक्त माहितीसाठी आहे. याबाबत तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Zika virus Is Disease Fatal?
Zika Virus Symptoms: झिका व्हायरस कशामुळं फैलावतो, काय आहेत लक्षणे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com