Priya More
कोरोनानंतर भारतात झिका व्हायरसने डोकं वर काढले आहे. त्यामुळे टेन्शन वाढले आहे.
झिका व्हायरस हा डासांमुळे होणारा व्हायरल संसर्ग आहे.
झिका व्हायरस डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरत आहे.
झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर व्यक्तींना चावल्याने व्हायरस पसरतो.
झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला ताप येतो.
झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखीचा त्रास होतो.
झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला अशक्तपणा येतो, डोळे लाल होतात, उलटीचा त्रास होतो.
झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवर पुरळ येतात.
झिका विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत नाहीत.