Pune News: पुण्यात बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखले, जीवे मारण्याची दिली धमकी; धक्कादायक VIDEO आला समोर

Builder Points Pistol At Farmer: पुण्यात बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखत त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडीतील ही घटना आहे.
Pune News: पुण्यात बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखले, जीवे मारण्याची दिली धमकी; धक्कादायक VIDEO आला समोर
Builder Points Pistol At FarmerSaam Tv

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून (Pune) धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पुण्यातील विश्रांतवाडीतील ही घटना आहे. बिल्डरच्या ऑफिसमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटना समोर आली त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एका बिल्डरने शेतकऱ्यावरती पिस्तुल रोखले. या शेतकऱ्याला पिस्तुलने उडवून टाकण्याची धमकी या बिल्डरने दिली. विश्रांतवाडीतील हा प्रकार असून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिवसाढवळ्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्यावरती पिस्तुल रोखत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. प्रभाकर भोसले असे या बिल्डरचे नावा आहे.

Pune News: पुण्यात बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखले, जीवे मारण्याची दिली धमकी; धक्कादायक VIDEO आला समोर
Pune Zika Virus News: पुणेकरांची चिंता वाढली; हडपसरमध्ये आणखी एक झिका रुग्ण!

रांजणगाव येथील शेतकऱ्याची जमीन बिल्डर प्रभाकर भोसले यांनी विकत घेतली होती. घरासाठी पैसे देतो म्हणून प्रभाकर भोसले यांनी शेतकऱ्याला अर्धीच रक्कम दिली. तर उर्वरीत पैसे नंतर दिलेच नाही. पैसे न दिल्याने हा शेतकरी प्रभाकर यांच्या ऑफिसमध्ये आला होता. यावेळी चर्चा करत असताना प्रभाकर शेतकऱ्यावर संतापले. त्यावेळी प्रभाकर यांनी आपल्या जवळील पिस्तुल काढले आणि शेतकऱ्यावर रोखले. पण दोघांनी मध्यस्ती केल्यामुळे त्यांनी पिस्तुल आतमध्ये ठेवली.

Pune News: पुण्यात बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखले, जीवे मारण्याची दिली धमकी; धक्कादायक VIDEO आला समोर
Mumbai- Pune Expressway: मुंबई पुणे महामार्गावर लुटमार करणारी टोळी अटकेत; 5 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त

बिल्डर प्रभाकर भोसले यांचा हा व्हिडीओ शेतकऱ्याच्या हाती लागला. हा व्हिडीओ घेऊन शेतकऱ्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि प्रभाकर भोसलेंविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस पुढचा तपास करत आहेत. हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत शेतकऱ्याकडे कुठली माहिती नाही. पण बिल्डर प्रभाकर भोसले शेतकऱ्यांना अशापद्धतीने पिस्तुलीचा धाक दाखवत फसवत असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे.

Pune News: पुण्यात बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखले, जीवे मारण्याची दिली धमकी; धक्कादायक VIDEO आला समोर
Pune Metro: गुड न्यूज! पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकारक होणार, स्वारगेटपर्यंतची मेट्रोसेवा गणेशोत्सवाआधीच सेवेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com