pune Crime News samm tv
मुंबई/पुणे

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Pune Crime News : पुण्यातील तरुणाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली. वडगावशेरीत हा प्रकार घडला आहे.

Akshay Badve

पुण्यात मुलाने प्रॉपर्टीसाठी मातेवर आणि बहिणीवर अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध आईला जबरदस्तीने वृद्धाश्रमात डांबलं. तर बहिणीला मानसिक आजारी असल्याचे कारण देत जबरदस्तीने मनोरुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी तरुणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वडगावशेरीतील सिंह हाऊसिंग सोसायटीत ही धक्कादायक उघडकीस आली आहे. आरोपी धर्मेंद्र राय या व्यक्तीने आपल्या बहिणीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने मनोरुग्णालयात दाखल केले. तसेच वयोवृद्ध आईने घरावरून हक्क सोडण्यास नकार दिला म्हणून तिलाही जबरदस्तीने वृद्धाश्रमात नेऊन ठेवण्यात आले. यामागचा हेतू घर त्यांच्या नावावर करून घेणे असल्याचे समोर आले आहे.

या महिलेने मनोरुग्णालयातून आपल्या मैत्रिणींना सांगून सुटका करून घेतली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. अखेर पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र राय याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणात आरोपीने प्रॉपर्टीसाठी आई आणि बहिणीवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.

आरोपीला अटक करण्यात आली त्याला न्यायालय समोर हजर केले. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पैशांसाठी माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.आई आणि बहिणीसोबत प्रॉपर्टीसाठी केलेला हा छळ हा समाजाच्या आरश्यातला काळा कोपरा दाखवणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनाला गेलेले तीन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघे बेपत्ता

गँगवॉर पेटलं! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या खूनाचा बदला; आरोपीच्या मुलालाच संपवलं, पुण्यात थरार

SCROLL FOR NEXT