Who is Suraj Chavan : विजय घाडगेंना मारहाण करणारे सूरज चव्हाण आहेत तरी कोण? जाणून घ्या

Suraj Chavan Rada news : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सूरज चव्हाण यांनी मारहाण केली. या राड्यामुळे सूरज चव्हाण चर्चेत आले आहेत. सूरज चव्हाण यांच्याविषयी जाणून घ्या
Suraj Chavan News
Suraj Chavan Saam tv
Published On

Latur NCP Rada : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झाला. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यासहित कार्यकर्त्यांना मारहाण केली. मारहाण करण्यात सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. छावा संघटनेचे विजय घाडगे यांना मारहाण करण्यात सूरज चव्हाण आघाडीवर होते. घाडगे यांना मारहाण करणारे सूरज चव्हाण नेमके कोण आहेत? जाणून घेऊयात.

कोण आहेत सूरज चव्हाण?

सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष होते. सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते समजले जातात. सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र युवक कार्याध्यक्षपदाची देखील जबाबदारी पार पडली आहे. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण हे मुळचे लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळचे रहिवासी आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या १० नेत्यांमध्ये सूरज चव्हाण देखील होते. अजित पवार यांनी २०१९ साली पहाटे शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्याची जबाबदारी सूरज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

Suraj Chavan News
Maharashtra Honey Trap Case : हनी ट्रॅपमध्ये अडकलेले ते ४ मंत्री , १५ आमदार कोण?

दरम्यान, लातुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. लातुरात सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर पत्ते फेकले. यानंतर सूरज चव्हाण यांनी कोपर आणि बुक्क्यांनी विजय घाडगे यांना मारहाण केली. सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, आजच्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Suraj Chavan News
Satara Shocking : तीच मुलगी अन् तोच मुलगा, याआधीही हल्ल्याचा प्रयत्न; साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, धक्कादायक VIDEO

अजित पवारांनी काय सूचना दिल्या होत्या?

अजित पवार म्हणाले होते की, 'लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com