Plane crash : मोठी बातमी! हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळलं, परिसरात खळबळ, VIDEO

Bangladesh plane crash : हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळल्याची घटना घडली आहे. बांगलादेशात ही घटना घडली आहे.
plane crash update
plane crashSaam tv
Published On

Bangladesh air force training aircraft crashed : बांगलादेशची राजधानी ढाका येथे हवाई दलाचं विमान कोसळलं आहे. ढाका शहरातील एका कॉलेज कॅम्पसमधील इमारतीवर हे विमान कोसळलंय. बांग्लादेश हवाई दलाचं हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट होतं. या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथील अग्निशमन यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

plane crash update
Kolhapur Special : कुस्तीचा डाव अन् मटणावर ताव;कोल्हापूरकरांचा नाद करता का राव, वाचा आकाड स्पेशल रिपोर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. हे विमान कोसळल्यानंतर कॉलेज कॅम्पसमधील एका इमारतीला धडकलं. त्यानंतर मोठी आग लागली. यात कॉलेजमधील सहा ते सात विद्यार्थी गंभीररित्या होरपळले आहेत.

बांगलादेशाच्या हवाई दलाचं ट्रेनिंग जेट F-7 BJI विमान हे माइलस्टोन शाळा आणि कॉलेज कॅम्पस परिसरात कोसळलं. विमान कोसळल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विमान शाळा परिसरात कोसळल्याने इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. विमान कोसळल्याच्या घटनेनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

plane crash update
Nashik Shocking : आईचा त्रास बघवला नाही...; महिला पोलिसाच्या मुलीनं आयुष्य संपवलं

विमान अपघातानंतर झाल्यानंतर परिसरात मोठा भडका उडाला. अपघातानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेकांची धावाधाव पाहायला मिळत आहे. अनेक जण आराडाओरड करत सुरक्षित ठिकाणी पळ काढताना दिसत आहेत. या अपघातामधील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

plane crash update
Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा

या दुर्घटनेत काहींचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमान अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानाच्या पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com