
गटारी अमोशाचा बेत... अन आकडाचं शेवटचं दिस मटणाची पार्टी तर झालीच पाहिजे...
पुढे लागणार आहे श्रावण मग बना आताच रावण...
तात्याच्या डोसक्याला मटणाचा किडा हलला... घेतलं दोस्ताला अन् पिशवीत घातला डबा.. गाडीला हाणली किक आणि थेट गाटलं नॅशनल मटन शॉप. कसं नुसतं हाण का बिडीव कार्यक्रम
मटणाला बघितलं तात्या हरकून गेलं... तोंड गुलाबवानी फुललं... रस्सा मंडळीच्या आवडीचं पीस तात्यांना सांगूनच टाकलं एकदम काटा किर्ररररर...
नुसतं चार पायावर भागायचं नाही म्हणून तात्या म्हणलं दोन पाय बी उरकून टाकू... मग तात्यांनं गाठलं चिकन शॉप.... तिथं बी दोन चार किलो कळ्या पिशवीत भरलं... अन् थेट गाठली दोस्तांची गल्ली.... आवाज देऊन देऊन तात्यानं तरणी बांड दोस्त मंडळी.
मग काय कुणी आणला गॅस तर कुणी आणली शेगडी... कोणाच्या हातात कांद्याची पिशवी तर कोणाच्या हातात मसाल्याचा डबा... आता कसा होतोय झणझणीत बेत नुसतं बघा.
ठरल्या जागेवर रस्सा मंडळी हजर.चराचर कापला कांदा... अन त्याल लागलं तापायला... तांबडा- पांढरा लागला उकळायला.. मटन लागलं शेजायला आणि शाहीर लागलंल गायाला... हाय का नाही एकदम फक्कड... घुमिव भावा घुमिव भावा ... नुसता काटा किर्ररर बेत झाला पाहिजी... तिकडं दोस्ताला व्हिडिओ कॉल करून बी दावला
मटन शिजले का बघता बघता तिकडे भावानं दोन चार पीस हाणलं... ती बी दाबून.. हाय नाय गंम्मत.... तात्यांना बी जरा तांबड्याचा झुरका हणला...
मटन शिजल रस्सा मंडळीना घोळका घातला... तांबड्या पांढऱ्याच्या वाट्या भरल्या.. सुख आणि आळणी बाजूला मांडलं ... चपात्या मोडल्या भात वाढला... कांदा एका बुक्कीत फोडला अन ताटात वाढला कुणी वरपून खाल्लं तर कुणी नळ्यात ठोकून खाल्लं... आकाड स्पेशल दणक्यात साजरा... गटारी अमावस्या चा विजय असो...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.