Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा

Mumbai Goa Highway Traffic news : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीये. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
Mumbai Goa Highway Traffic news
Mumbai Goa Highway Traffic news Saam tv
Published On

Mumbai Goa Highway Traffic update : रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव बाजाराच्या पेठ ते मुगवली फाट्यादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे कोकणातून मुंबईकडे निघालेले पर्यटक माणगावमध्ये वाहतूक कोंडीत अडकले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Mumbai Goa Highway Traffic news
Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

मुंबई-गोवा महामार्गासहित अलिबाग पेण मार्गावर वाहनांची रांगा लागल्या आहेत. अलिबाग पेण मार्गावरील शहाबाज ते धरमतरदरम्यान तीन वीराधरण परिसर अशा दोन ठिकाणी वाहनांची रांग लागली आहे. अलिबागकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. धरमतर पुलाजवळील खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकामुळे लागल्या वाहनांची रांगा लागल्या आहेत. केवळ 10 किलो मीटर अंतर पार करायला लागत दीड तास लागत आहे.

Mumbai Goa Highway Traffic news
Sangli : आईचा हात पकडून मुलगा घरी निघाला; अर्ध्यात काळाने डाव साधला; ६ वर्षीय मुलाला डंपरने चिरडलं

रायगड ते माणगाव मार्गावर मिनीबसला अपघात

किल्ले रायगड ते माणगाव मार्गावर पर्यटकांच्या मिनिबसला अपघात झाला आहे. घरोशीवाडी येथील अवघड वळणावर मिनीबस उलटली. या अपघात एक पर्यटक गंभीर झाला आहे. तर 10 पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर जखमी पर्यटकांवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Mumbai Goa Highway Traffic news
Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

बसमधील प्रवासी तरुणाने सांगितलं की, 'आम्ही रायगडहून पुण्याला निघालो होतो. बसमध्ये ३२ प्रवासी होते. घरोशीवाडी येथे बसला ब्रेक मारल्यानंतर गाडी घसरली. त्यानंतर बस उलटली. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं'. दरम्यान, अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्यावरून वाहतूक कोंडी सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com