राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये अजित पवार गटाला ठाकरे गटाने आणखी एक धक्का दिला आहे. एकीकडे अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंना आव्हान देत लोकसभेचे रणशिंग फुंकले असताना शिरुरमधील अजित पवार गटाचे समर्थक शैलेश मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शैलेश मोहिते पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश...
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले शैलेश मोहिते पाटील (Shailesh Mohite Patil) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. तळेगांव दाभाडे येथे युवासेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शिवबंधन बांधून शैलेश मोहित पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला.
कोण आहेत शैलेश मोहित पाटील?
शैलेश मोहिते पाटील हे आळंदी खेड तालुक्याचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच मावळमधील अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला होता. मावळनंतर आता शिरुरमध्ये बडा नेता ठाकरेंच्या गोटात केल्याने अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आदित्य ठाकरेंचे पिंपरी चिंचवडमध्ये शक्तीप्रदर्शन..
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांचं पिंपरी चिंचवड शहरात शिवसैनिकांनी मोठी बाईक रॅली काढून जोरदार स्वागत केले. तसेच आदित्य ठाकरे पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ जाहीर सभाही घेणार आहेत. या सभेतून ते कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.