Pandharpur: मंगळवेढ्यात अवतरले राम, सीता, लक्ष्मण, हनुमान; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ता सर्वत्र विद्युत रोषणाई

Ayodhya Ram Mandir: राम वनवासातून परत येताना व आयोध्या नगरीत स्वागत करतानाचे प्रसंग देखील या बाल कलाकारांनी हुबेहूब वेशभूषा करून आपल्या अभिनयातून साकारले आहेत.
Pandharpur
PandharpurSaam TV
Published On

Ayodhya Ram Mandir Inauguration:

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने पंढरपूरच्या मंगळवेढ्यात प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमानाच्या वेशभूषेतील बालकलाकार अवतरले आहेत. प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अयोध्येसह देशभर आनंदाचे व भक्तिमय वातावरण आहे.

Pandharpur
Mere Raam Aayenge : मेरे राम आएंगे...; स्वस्ति मेहुल यांनी गायलेलं भजन PM मोदींनी केलं शेअर, ऐकून मन भक्तिभावानं भरून जाईल!

मंगळवेढ्यातील सिद्धार्थ अर्जुन नागणे याने श्रीरामाची, शीवण्या विनायक कलुबमे हिने सितेची, शिवतेज विनायक कलुबर्मे याने लक्ष्मणाची तर सार्थक आनंद खटावकर याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. चिमुकल्या मुलांनी केलेली वेशभूषा पाहुल सारेच चकीत झालेत. राम मंदिराच्या उत्सवाचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच आनंद होत आहे.

राम वनवासातून परत येताना व आयोध्या नगरीत स्वागत करतानाचे प्रसंग देखील या बाल कलाकारांनी हुबेहूब वेशभूषा करून आपल्या अभिनयातून साकारले आहेत. मंगळवेढ्यात या बाल कलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी सर्वत्र उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशात आज देखील रविवार असल्याने शहरांत आणि गावागावांत नागरिकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आज देशभरामध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष सुरू असून याच पार्श्वभूमीवर बीडच्या परळी शहरात प्रभू श्रीरामाची भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे दोघे बहिण भाऊ या शोभा यात्रेमध्ये सहभागी झाले असून हजारोंच्या संख्येने या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम भक्त सहभागी झाले आहेत.

श्री रामाची पंधराशे चौरस फूट भव्य रांगोळी...

भगवान राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत, अशातच राम भक्तांचा उत्साह बघण्यासारखा आहे. नागपूरच्या श्री संती गणेश उत्सव आणि सांस्कृतिक मंडळाच्यावतीने प्रभू श्री रामाची पंधराशे चौरस फूट रांगोळी काढण्यात आली आहे. रांगोळी कलाकार निकिता हिरुळकर यांनी सलग १८ तासात ३०० किलो विविध रंगांच्या रांगोळीचा वापर करून श्री रामाचा दरबार साकारला आहे.

Pandharpur
Ram Mandir Inauguration : रामभक्ताकडून ११११ किलोचा राम लाडू; २२ जानेवारीला होणार प्रसाद स्वरूपात वाटप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com