अयोध्येत श्री राम मंदिराच्या लोकार्पणाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिराचे लोकार्पण होईल. संपूर्ण देश भक्तिमय झाला आहे.
अयोध्येत जणू मोठा उत्सव आणि उत्साहाचं वातावरण आहे. त्याचदरम्यान गायिका स्वस्ति मेहुल यांनी गायलेल्या 'मेरे राम आएंगे...' भजन जोरदार चर्चेत आहे. स्वतः मोदी यांनी हे भजन सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गायिका स्वस्ति मेहुल (Swasti Mehul) यांचं 'मेरे राम आएंगे..' हे भजन सध्या जोरदार चर्चेत आहे. स्वस्ति यांनी भगवान श्रीरामासाठी गायलेलं हे भजन प्रचंड व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही हे भजन प्रचंड भावलं आहे. त्यांनी स्वतः हे भजन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलं आहे.
'स्वस्ति यांचं हे भजन एकदा ऐकलं की ते कानात रुंजी घालतंय. डोळे अश्रूंनी आणि मन भक्तीभावानं भरून जातं,' असं मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये मोदींनी या भक्तिमय राम भजनाच्या व्हिडिओची लिंक शेअर केली आहे.
अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अवघी अयोध्यानगरी भक्तीभावानं फुलली आहे. अनेक गायकांनी राम भजन गायले आहेत. ते सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
राम मंदिराचं लोकार्पण होणार असल्यानं अवघी भारतभूमी भक्तिमय झाली आहे. त्यामुळं राम भजनांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तत्पूर्वी जुबिन नौटियालनं एक भजन गायलं होतं. तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शेअर केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.