Ayodhya Ram Mandir: 392 खांब, 5 मंडप, 25000 क्षमतेचे दर्शन केंद्र... काय आहेत राम मंदिराच्या 10 खास गोष्टी?

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणेसाठी २२ जानेवारीला एक लाखाहून अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSaam Digital
Published On

Ayodhya Ram Mandir

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणेसाठी २२ जानेवारीला एक लाखाहून अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नागह शैलीत बांधलेल्या राम मंदिराची लांबी ३८० फूट आहे, तर रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. मंदिराचा प्रत्येक मजला २० फूट उंच असून मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असणार आहेत. मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून राम मंदिरात अनेक खास गोष्टी असणार आहेत.

1.अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती असलेल्या तात्पुरत्या मंदिरात १९४९ पासून भाविक प्रार्थना करत आले आहेत. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर सुरू झालेल्या मंदिर बांधकामासाठी हे मंदिर देखील हस्तांतरित करण्यात आले होते.

2.अयोध्येतील निर्माणाधीन श्री राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिराची लांबी ३८० फूट आहे, तर रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट असेल.

3.मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असणार आहेत. मुख्य गर्भगृहात, भगवान श्री राम यांचे बालस्वरूप आणि पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असेल.

4.मंदिरात नृत्य मंडप, रंगमंडप, रंगमंडप, सभामंडप, प्रार्थना मंडप आण कीर्तन मंडप असे पाच मंडप असतील. भिंती आणि खांबावर देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. सिंहद्वारापासून ३२ पायऱ्या चढून पूर्व दिशेने मंदिरात प्रवेश होईल. मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.

5.मंदिराभोवती एक आयताकृती भिंत असणार आहेत या भिंतीची चारही दिशांना एकूण लांबी ७३२ आणि रुंदी १४ फूट असणार आहे. तर उद्यानाच्या चार कोपऱ्यात सूर्यदेव, माता भगवती, गणपती आणि भगवान शिव यांना समर्पित चार मंदिरे बांधण्यात येणार आहेत. दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर असेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ayodhya Ram Mandir
Corona Virus In India : नागरिकांमध्ये कोरोनाची पुन्हा भीती; गेल्या २४ तासांत आढळले ७०० हून अधिक रुग्ण, दोघांचा मृत्यू

6. मंदिराजवळ प्राचीन काशातील सीताकूप असणार आहे. तसेच मंदिरातील प्रस्तावित इतर मंदिरे महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांनी समर्पित असतील. नवरत्न कुबेर टिळावर भगवान शिवाच्या प्राचिन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून तिथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे.

7. मंदिरात लोखंडाचा वापर केजा जाणार नाही. मंदिराच्या खाली १४ मीटर जाडीचा कॉम्पॅक्टेड क्राँक्रीट टाकण्यात आला आहे. त्याचा कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे. तर मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचं संरक्षण व्हावं यासाठी ग्रॅनाइटचा २१ फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे.

८. मंदिर संकुलात वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनसाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन उभारण्यात आले आहे.

९. २५ हजार क्षमतेचे प्रवासी सुविधा केंद्र उभारले जात आहे. याठिकाणी लॉकरची सुविधा असेल.

१०. याशिवाय स्नागगृह, स्वच्छतागृह, पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर पूर्णपणे भारतीय वास्तूशास्त्रानुसार उभारले जात आहे. पर्यावरण आणि जलसंवर्धनावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. ७० टक्के मंदिर परिसर सदाहरीत असणार आहे.

Ayodhya Ram Mandir
Corona JN.1 Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1च्या रुग्णसंख्येत वाढ, दोन नवीन लक्षणे आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com