भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश दिले आहेत.
kalyan news
kdmc newsSaam tv
Published On
Summary

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात भ्रष्टाचाराचे आरोप

भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महासभेत उपस्थित केला मुद्दा

सुमारे ३० लाख रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दिलेल्या कंत्राटात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आलाय. भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महासभेत हा मुद्दा उपस्थित करत गंभीर आरोप केल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे कंत्राट देण्यात आलेल्या संस्थेला महापालिकेकडून मुदतवाढ देण्यात आलेली नाही. तरीही त्या संस्थेने तब्बल तीन महिने काम केल्याचे दाखवून जवळपास ३० लाख रुपये उचलले. तसेच संबंधित डॉक्टरने महापालिका आणि कंत्राटदार संस्था या दोन्ही ठिकाणाहून पगार घेतल्याचाही आरोप त्यांनी केला.

kalyan news
Noida Crime News: कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्यासाठी महिला आणि IAS अधिकाऱ्याची जोरदार हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर VIRAL

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करताच महापौर हर्षाली चौधरी यांनी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. आयुक्तांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे महासभेत स्पष्ट केले.

तत्पूर्वी, शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे निर्बीजीकरणाच्या कामात झालेल्या कथित गैरप्रकारामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीत नेमके काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

kalyan news
Jalgaon News: चैनपुलींगच्या प्रकरणात एकाच महिन्यात ३ लाखांचा दंड

राजगुरुनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचे टोळी युद्ध

पुणे जिल्ह्यातील चाकण येथे मध्यरात्री भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना ताजी असतानाच राजगुरुनगर शहरातूनही धक्कादायक चित्र समोर आलंय. राजगुरुनगर शहरातील भरवस्ती भागात भटक्या कुत्र्यांच्या दोन टोळ्यांमध्ये अक्षरशः टोळीयुद्ध सुरू झालंय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या कुत्र्यांच्या भांडणाच्या वेळी त्या ठिकाणी महिला आणि लहान मुले उपस्थित होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com