Noida Crime News: कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्यासाठी महिला आणि IAS अधिकाऱ्याची जोरदार हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Crime News: अशातच पाळीव कुत्रावरुन वादावादीचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे.
Noida Crime News
Noida Crime NewsSAAM DIGITAL
Published On

Noida Crime News

उत्तर प्रदेशातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात मोठमोठ्या सोसायटीमध्ये पाळीव प्राण्यावरुन भाडणांचे प्रकार समोर येत असतात. अशातच पाळीव कुत्रावरुन वादावादीचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. यात कुत्र्यावरुन एक महिला आणि निवृत्त आईएएस पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झालीये. यात महिलेच्या पतीकडून निवृत्त आईएएस पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. या पुर्ण घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Noida Crime News
Viral Video: अफगाणिस्तानच्या विजयानंतर इरफानचा 'झुमे जो पठाण'! यावेळी भज्जीनेही दिली साथ;पाहा Video

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, सदर घटना ही सेक्टर-१०८ येथील पार्क लॉरिएट सोसायटीतील आहे. व्हिडीओतील महिलेला आपल्या जवळील पाळीव कुत्र्याला सोसायटीच्या लिफ्टमधून घेऊन जायचे होते. परंतू निवृत्त आईएएस पोलीस अधिकारी हे महिलेला कुत्र्याला लिफ्टमधून घेऊन जाण्यापासून मनाई करत होते. याचदरम्यान त्या दोघांमध्ये भांडण होते. भांडण इतक्या टोकाला जाते की त्याचे रुपांतर हाणामारीत होते. महिला ही अधिकाऱ्याचा फोन घेचून घेते यावरुन अधिकारी हा महिलेच्या कानीखाली मारतो. त्यादरम्यान महिलेचा पती तिथं येऊन तोही निवृत्त आईएएस पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करतो.

हा घटनेची माहिती सेक्टर-३९ पोलिसांना मिळताच. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचतात. पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ आणि सोसायटीमधील सीसीटीव्ही फूटेज तपासले. यानंतर या प्रकारातील महिला आणि निवृत्त आईएएस पोलीस अधिकारी यांनी वाद मिटवला.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गौतम बुद्धनगर येथील पोलीस आयुक्त यांनी आपल्या ट्वीटर अंकाऊटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यात त्यानी लिहीले आहे की, नोएडामध्ये कुत्र्याला लिफ्टमध्ये नेल्याच्या कारणावरून निवृत्त आयएएस अधिकारी आरपी गुप्ता यांच्यावर एका महिलेने हल्ला केल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची चौकशी केल्यानंतर या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Noida Crime News
Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे राजीनामा द्या; आंदोलकाच्या मागणीची ऑडिओ क्लिप VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com