Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे राजीनामा द्या; आंदोलकाच्या मागणीची ऑडिओ क्लिप VIRAL

Amol Kolhe News Viral Audio Clip: या व्यक्तीला प्रत्युत्तर देणाऱ्या व्यक्तीचा आवाज अमोल कोल्हे यांचा असल्याचं म्हटलं जातंय.
Amol Kolhe
Amol KolheSaam TV
Published On

Viral Audio Clip:

मराठा आरक्षणाचा मुद्दा कालपासून चांगलाच पेटलाय. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन चिघळलं आहे. आरक्षणासाठी काही आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशात आता खासदार अमोल कोल्हे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी एका आंदोलकाने केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Kolhe
Maratha Aarakshan: सरकारने हो म्हटल्यावर टोकाच्या भूमिकेकडे जाऊ नये; बच्चू कडूंचं आंदोलकांना शांततेचं आवाहन

सोशल मीडियावर सध्या एक ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल झालीये. यामध्ये एक माराठा आंदोलक खासदारकीचा राजीनामा द्या असं म्हणत आहे. या व्यक्तीला प्रत्युत्तर देणाऱ्या व्यक्तीचा आवाज अमोल कोल्हे यांचा असल्याचं म्हटलं जातंय, मात्र 'साम टीव्ही' याची पुष्टी करत नाही.

खासदारकीचा राजीनामा द्या

व्हायरल क्लिपमध्ये आंदोलक व्यक्ती म्हणत आहे की, तुम्ही देखील तुमच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. त्यावर कोल्हेंच्या आवाजातील व्यक्ती म्हणत आहे की, हो मला यासाठी काही हरकत नाही. मात्र आपण लढलं पाहिजे. त्यावर समोरील मराठा आंदोलक व्यक्ती म्हणत आहे की, आरक्षणाचा मुद्द केंद्राच्या हातात आहे राज्याच्या नाही. आतापर्यंत काही आमदारांनी राजीनामा दिलाय. मात्र, आता खासदारांनी राजीनामा द्यायला हवा. सर्व अठ्ठेचाळीस खासदारांनी राजीनामा देऊन केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, अशी मागणी या व्यक्तीने केलीये.

सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आलंय. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी खरोखर खासदार अमोल कोल्हे राजीनामा देतील का? हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस आमदारांचा राजीनामा

एकीकडे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असताना आता काँग्रेसच्या आमदारांनी देखील राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपुडकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. ते वरपुडकर पाथरी मतदार संघातील आमदार आहेत.

माढा लोकसभा शिवसेना संपर्क संजय कोकाटे यांनी दिला पदाचा राजीनामा

माढा लोकसभा शिंदे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. त्यात कोकाटे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

Amol Kolhe
Jammu kashmir Crime: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com